India Answered to Pakistan for allegations on Operation Sindoor and Hinduttv at UNGA: संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेमध्ये संबोधन करताना शनिवारी, 27 सप्टेंबर 2025 पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी भारतावर अनेक खोटे आरोप केले. तसेच ऑपरेशन सिंदूर आणि भारतातील हिंदूत्वावर देखील टीका केली. भारताने देखील त्यावर पलटवार करत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या. त्यामुळे पाकिस्तानने केलेल्या आरोपांमुळे त्यांचीच फजिती झाल्याचं पाहायला मिळालं.
यावर उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करत भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी सांगितलं की, या सभेमध्ये सकाळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तथ्यहीन आरोप केले. दहशतवादाचा महिमा मांडला. तेच त्यांची परराष्ट्र धोरण आहे. शरीफ यांनी चुकीची माहिती दिली. पण भारताने 22 एप्रिल 2025 ला जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या 26 लोकांना मारणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं.
RBI ने मृत व्यक्तींचे खाते, लॉकरबाबतच्या नियमात केले मोठे बदल; वाचा काय झाला चेंज
या हल्ल्याची जबाबदारी देखील लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेजिस्टेन्स फ्रंटने घेतली असली तरी पाकिस्तानने भारताला हल्ल्याच्या धमक्या दिल्या. त्या दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक एअरबेस नष्ट केले होते. त्याचे फोटो देखील प्रसारित झालेले आहेत.
पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या बिल्डिंगचा विकासाला विरोधच; राजू शेट्टींचे मंत्री मोहोळांवर आरोप
तसेच गहलोत पुढे म्हणाल्या की, जर उदध्वस्त केलेले रनवे आणि राख झालेले हॅंगर हे पाकिस्तानला जर विजय वाटत असेल तर तर त्यांनी तो साजरा करावा. तसेच त्यांनी या दहशतवाद्यांना पाठिंबा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकचे लष्कर मुख्यलय सामिल होते. त्यावरून पाक सरकारची मानसिक स्थिती समजते. त्यामुळे जे पाकिस्तान ओसामा बिन लादेनला आसरा देत. दहशतवादाला विरोध करण्याचं नाटकं करतय.
हाकेंवर हल्ला करणारे जेरबंद! वाहनाच्या काचा फोडणारे तिघे ताब्यात
तसेच भारत पाकमधील या सर्व वादांवर ते दोन देश स्वत: तोडगा काढण्यावर सहमत आहेत. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाला स्थान नाही. असं ही यावेळी भारताने ठणकावून सांगितलं आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेमध्ये संबोधन करताना शनिवारी, 27 सप्टेंबर 2025 पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी म्हटलं की, नुकतच झालेल्या भारतासोबतचं युद्ध त्यांनी जिंकलं. हे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थिने शक्य झालं. भारतील कट्टर हिंदूत्ववाद हा जगासाठी आव्हान निर्माण करणारा आहे.ते तेथे हिंसा भडकवतात. त्यामुळे मी काश्मीरच्या लोकांना सांगेल की, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तसेच भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचेच सात विमानं आपघातग्रस्त झाले होते. असं म्हणत पाकने भारतावर अनेक खोटे आरोप केले.