पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या बिल्डिंगचा विकासाला विरोधच; राजू शेट्टींचे मंत्री मोहोळांवर आरोप

Raju Shetty यांनी पुण्यातील जैन बोर्डिंगच्या बिल्डींगचा विकास केला जाणार आहे. त्यावरून मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील आरोप केले आहेत.

Raju Shetty

Raju Shetty Allegations on Minister Murlidhar Mohol for Pune Jain Bording Building Development : पुण्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक अशा जैन बोर्डिंगच्या बिल्डींगचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी ही बिल्डींग बिल्डरला दिली जाणार आहे. मात्र ही जागा विकासकांना देण्यासाठी विरोध केला जात आहे. त्या जागेचा वापर शैक्षणिक कामासाठी करण्याची मागणी केली जात आहे. तसेच यावेळी बेलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील आरोप केले आहेत.

हाकेंवर हल्ला करणारे जेरबंद! वाहनाच्या काचा फोडणारे तिघे ताब्यात

यावर बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं की, पुण्यातील या जैन बोर्डिंगमध्ये 1958 पासून हजारो विद्यार्थी शिकले आहेत. या वास्तुशी सगळ्यांच्या भावना गुंतल्या आहेत. त्यामुळे ही जागा विकासासाठी बिल्डरला देण्यासाठी आमचा विरोध आहे. ही जागा न विकता हॉस्टेल शैक्षणिक कामासाठी वापर करा.

मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना मदत करताना निकषाचा डोंगर; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

ही जागा विकली जाणार आहे. त्यामध्ये गोखले बिल्डर आहेत. त्यामध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे त्यामध्ये शेअर्स आहेत. असा आरोप देखील यावेळी शेट्टी यांनी केला. त्यामुळे मोहोळ यांनी सांगून हा विक्रीचा निर्णय रद्द करावा. अशी मागणी यावेळी शेट्टी यांनी केली.

मोठी बातमी! ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंवर हल्ला; वाहनाच्या काचाही फोडल्या

तसेच पुढे शेट्टी म्हणाले की, या होस्टेलची जागा अद्याप विकली गेलेली नाही. मात्र धर्मादाय आयुक्तांकडून यासाठी चुकीचे पद्धतीने साठे खतला परवानगी देण्यात आली आहे. करार संशयास्पद आहे. असंही शेट्टी म्हणाले आहेत.

 

follow us