Today Hearing On NEET Paper Leak Case : देशभरात अनेक दिवसांपासून वादा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला विषय म्हणजे नीट पेपर लीक प्रकरण. त्यामध्ये राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेच्या(नीट) अनुषंगाने दाखल झालेल्या चाळीसपेक्षा जास्त याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. ( NEET Paper Leak) मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने शहर आणि परीक्षा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) दिले होते. त्यानुसार एनटीएने शनिवारी शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर केला होता.
अंतिम निकाल अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीला वेगळं वळण; जो बायडन यांची माघार, कमला हॅरिस यांना पाठिंबा
‘नीट’ संदर्भातील याचिकांवर आज सकाळी १० वाजल्यापासून सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. समुपदेशन तोंडावर आलं असल्याने याचिकांवर न्यायालय अंतिम निकाल देणार काय, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. नीट-यूजी परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असं वाटत असेल तर व्यापक प्रमाणात प्रश्नपत्रिका फुटल्याचं सिद्ध करा, अशी विचारणा सरन्यायाधीशांनी मागीलवेळी याचिकाकर्त्यांना केली होती.
७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण विशाळगडावरील हिंसाचाराला जबाबदार कोण ? संभाजीराजेंचे सविस्तर भूमिका मांडणारे पत्रच
पुन्हा एकदा जे शहर आणि केंद्रनिहाय निकाल आले आहेत ते चकित करणारे आले आहेत. त्यामुळे यासंदर्भात न्यायालय काही भाष्य करणार काय? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. गुजरातमधील राजकोट केंद्रातील ७० टक्के विद्यार्थी नीट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे १२ विद्यार्थ्यांना सातशेपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. याचप्रमाणे राजस्थानमधील सिकर येथील केंद्रातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राजस्थानचा विचार केला तर सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४८२ इतकी आहे. महाराष्ट्रात हीच संख्या २०५ इतकी आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर क्रमश: केरळ आणि उत्तर प्रदेश असून वरील राज्यांतील क्रमश: १९४ आणि १८४ विद्यार्थ्यांना सातशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
४०४ केंद्रातून परीक्षा
यंदा नीट परीक्षा देणाऱ्या २३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ३२१ विद्यार्थ्यांना सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले. हे विद्यार्थी २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २७६ शहरांतील एक हजार ४०४ केंद्रातून परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले असून त्यापैकी अनेकजण पारंपारिक शिकवणी वर्गांचे विद्यार्थी नाहीत, याकडं सूत्रांनी लक्ष वेधलं आहे.
केंद्रांचा समावेश बांगलादेशातील पीडितांनी पश्चिम बंगालचा दरवाजा ठोठावला, तरCM ममता बॅनर्जींचं मोठं विधान
यामध्ये सीकर, कोटा आणि कोट्टायमसारख्या शिकवणी वर्गांच्या विद्यार्थ्यांनीही सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. पण या यादीत लखनौ (३५), कोलकता (२७), लातूर (२५), नागपूर (२०), फरीदाबाद (१९), नांदेड (१८), इंदूर (१७), कटक आणि कानपूर (प्रत्येकी १६), कोल्हापूर, नोईडा, साहिबजादा अजितसिंह नगर (प्रत्येकी १४), आग्रा आणि अलीगड (प्रत्येकी १३), अकोला आणि पतियाळा (प्रत्येकी १०), दावणगिरी (८) आणि बनासकांठा (७) येथील केंद्रांतून परीक्षा देऊन सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविण्याची प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे.