ब्रेकिंग : धनुष्यबाण चिन्ह अन् शिवसेना पक्षाबाबत SC कोर्टात 12 नोव्हेंबर रोजी होणार फैसला…

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी पार पडली.

Shivsena Party And Symbol Hearing

Shivsena Party And Symbol Hearing

Shivsena party and Symbol Hearing In Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज (दि. 8 ऑक्टोबर 2025) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी पार पडली. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची? खटला कोण जिंकणार असे प्रश्न सर्वांसमोर होते. पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणी आता 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शिवसेना पक्षाचे चिन्ह (Shivsena party and Symbol Hearing) निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) सर्वोच्च न्यायालयात याबाबत आव्हान दिले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालावधी जवळ येत असल्याने उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अंतरिम अर्जाद्वारे पक्ष आणि चिन्ह वापरण्यावर तात्पुरते निर्बंध घालण्याची मागणी (Supreme Court) केली होती.

निवडणूक आयोग आणि पक्ष विभाजन

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. बहुसंख्य आमदारांनी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा सोडून शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. या घटनांनंतर शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने संख्याबळाच्या आधारे ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. यानंतर उद्धव ठाकरे यांचा गट मशाल चिन्हावर निवडणुकांमध्ये भाग घेत आहे.

वकिल असीम सरोदे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी सांगितलं होतं की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण आज जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर 16 नंबरवर सुनावणीसाठी आहे.काही आधीच्या प्रकरणांमुळे बेंच अर्धवट आहे, त्यामुळे आज प्रकरण पूर्ण होईल की नाही, हे प्रश्नचिन्ह कायम होते. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात, असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं होतं.

Exit mobile version