Download App

Wayanad landslides: आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता ! अतिवृष्टीमुळे मदतकार्यात अडथळे

गळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे घरे उध्वस्त झाले आहेत. मुंडक्काई, चूरलमला, अट्टमला आणि नूलपुझा गावांना फटका.

  • Written By: Last Updated:

Wayanad landslides: वायनाडमधील भूस्खलनात ( Wayanad landslides) मृतांची संख्या वाढली असून, आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 116 जण जखमी झाले आहेत. अजूनही काही नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे केरळमध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala Chief Minister Pinarayi Vijayan) यांनी दिली.

मंगळवारी पहाटे वायनाडमधील मेप्पडीच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात एक गाव गाडले गेले आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 108 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या याव्यतिरिक्त मलप्पुरममधील चालियार नदीतून 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती केरळचे मुख्य सचिव व्ही. वेणू यांनी दिली.

राज्यात रेड अलर्टचाही इशारा
केरळमध्ये अतिवृष्टीमुळे मोठी जीवितहानी झाली आहे. आता पुन्हा या भागात भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. केरळमध्ये बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. इडुक्की, थ्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा आहे. तर पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलमसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


अनेक गावांचा संपर्क तुटला

मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे घरे उध्वस्त झाले आहेत. तर झाडे उन्मळून पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंडक्काई, चूरलमला, अट्टमला आणि नूलपुझा गावे या भूस्खलनामुळे बाधित झालेली आहेत. या भागाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. अतिवृष्टी आणि वादामुळे हेलिकॉप्टरचाही उपयोग करता येत नाही. तसेच जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठाही होत नाही.

follow us