Download App

राज्यावर पुन्हा घोंगावतयं संकट! मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

IMD warn for Shakti cyclone राज्यावर पुन्हा संकट हवामान विभागाचा मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत 'शक्ती' चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज

IMD warn for Shakti cyclone to Mumbai and Konkan till 7 October : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पडणारा पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत. त्यातच आता राज्यावर पुन्हा संकट घोंगावतयं कारण आता हवामान विभागाने मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तवला आहे.

ट्रम्प यांच्या अल्टीमेटमनंतर हमासने गुढघे टेकले! गाझावरील ताबा अन् इस्त्राइली बंधकांना सोडणार

यामध्ये हवामान विभागाने शक्ती चक्रीवादळाचा इशारा देत मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यामध्ये 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस, ताशी 45-65 किमी वेगाने वादळी वारे वाहतील समुद्रात लाटा उसळतील वाऱ्याचा वेग आणखी देखील वाढू शकतो.

गौतमी पाटीलला अटक होणार? पुण्यातील अपघात प्रकरणी थेट चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन

या पार्श्वभूमीवर आयएमडीने समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना तसेच मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये मदत पथकांना सावद राहून मदतीस सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दरम्यान मराठावाडा आणि पुर्व विदर्भात देखील पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कधी चढ-उतार कधी आनंदी-आनंद कसा आहे? बाराही राशींसाठा आजचा दिवस जाणून घ्या…

दुसरीकडे राज्यात 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात 29 सप्टेंबर 2025 पासून हवामान स्थिर आहे. मात्र 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल.

follow us