Uddhav Thackeray And Sharad Pawar: ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. काही नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका साडेचार वर्षे, तीन वर्षे होऊ शकल्या नाहीत. आता सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदांवर प्रशासन राज आहे. त्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या निवडणुकाबाबत महत्त्वाचा आदेश दिलाय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्यामुळे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. त्यानुसार प्रभाग रचना, आरक्षण सोडत असे प्रशासकीय कामकाज सुरू होईल. केंद्रात, राज्यात सत्ता असलेल्या महायुतीसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. परंतु त्यापेक्षा शरद पवार, (Sharad Pawarr) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह काँग्रेससाठी ही निवडणूक तितकीच महत्त्वाची का आहे हे आपण या व्हिडिओत पाहूया….
100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम : मुख्यमंत्री फडणवीसांची चौंडीत मोठी घोषणा
मुंबईतून ठाकरेंना पुन्हा उभारी मिळेल का ?
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक येथे पूर्वी शिवसेनेची ताकद होती. गेल्या वेळी नाशिकची महानगरपालिका भाजपने राज ठाकरे यांच्या मनसेकडून हिसकावून घेतली होती. उद्धव ठाकरेंना उभारी घ्यायची असेल तर या महानगरपालिकांवर पुन्हा आपला झेंडा फडकावा लागणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून आले आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील हे तीन खासदार मुंबईतून निवडून आले. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाचा एक, एक काँग्रेस आणि एक भाजपचा खासदार आहे. विधानसभेला ठाकरे यांचे वीस आमदार निवडून आलेत. त्यातील दहा आमदार मुंबईतील आहेत. त्यामुळे ही ताकद ठाकरेंनी एकत्रित करून लढले तर त्याचा फायदा ठाकरेंना होईल. पण एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक हे आपल्या पक्षात घेतलेत. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याचे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखविला आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली ही निवडणूक ही महत्त्वाची आहे. त्यामुळे येथे ठाकरेंचा कस लागणार आहे.
सरकारचा मोठा निर्णय, राज्यात सुरु होणार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती पुरस्कार योजना
महायुती एकत्र लढणार का ?
महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. हा शहरापासून ग्रामीण भागात आता त्यांचा जनाधार वाढलेला आहे. मुंबईत बहुभाषिक मतदार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका कशी आपल्या ताब्यात घेता येईल याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. त्यामुळे वेळ आली तर भाजप स्वतंत्र्यपणे येथे मैदानात उतरू शकतो, अशी राजकीय चर्चा आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुत एकत्रित असेल. स्थानिक पातळीवर एखाद्या ठिकाणी वेगळा निर्णय होऊ शकतो, पण एकूणच या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपची ताकद, आपली ताकद वाढावयची आहे. त्या ठिकाणी ते स्वतंत्र लढू शकतात.
महाविकास आघाडी बॅकफूटवर पण एकत्रितच लढणार का ?
महाविकास आघाडीला विधानसभेनंतर अनेक माजी आमदार, पदाधिकारी सोडून गेले आहेत. अजित पवार यांनी सांगली, जळगावमधील शरद पवार गटाच्या माजी आमदारांना गळाला लावले आहे. एकनाथ शिंदेही ठाकरे गट, काँग्रेस फोडून आपल्याकडे घेत आहेत. त्यामुळे काँग्रेस, ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षाला गळती लागलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आपल्यातील हेवेदावे सोडून एकत्रच लढावे लागणार आहे.
राज ठाकरेंबरोबर घेणार का ?
राज ठाकरे यांचा पक्ष रसातळाला गेलाय. विधानसभेला एकही आमदार निवडून आलेला नाही. या परिस्थिती राज ठाकरे हे महाविकास आघाडीला येऊन मिळाले, तर महाविकास आघाडीची ताकद वाढले. तसेच दोन्ही ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. उद्धव व राज ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास शहरी भागात दोघांना फायदा होईल.
उमेदवारांचा शोधापासून संघर्ष
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी रांगा लागतील. या परिस्थितीत दुसऱ्या पक्षातील तगडे उमेदवार आपल्याकडे घेणे, नवखे उमेदवार शोधून त्यांना ताकद देण्याचे काम महाविकास आघाडीला करावे लागणार आहे.
जागा वाटप महत्त्वाचे
महाविकास आघाडीला पुन्हा उभारी घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवावा लागणार आहे. जागा वाटपाची विधानसभेची चूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टाळावी लागणार आहे. काँग्रेसची ताकद विदर्भात आहे. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात आहे. तशी शिवसेनेची ताकद ही शहरी भागात आहेत. त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या जागा ताकद पाहून वाटप झाले तर महाविकास आघाडीला यश मिळू शकते, नाहीतर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळणार नाही.
जातीय समीकरणावर गणित अंवलबून
या निवडणुकीत जातीय समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावर मुस्लिम समाजामध्ये नाराजी आहे. ती नाराजीचा फायदा महाविकास आघाडीने घेतल्यास मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या भागात जास्त नगरसेवक निवडून आणता येऊ शकतात.
मनी पॉवर
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनी पॉवर आपण बघितला आहे. अनेक ठिकाणी मतदारांना लक्ष्मीदर्शन झाले. विधानसभेला हजारो कोटींचा धूर निघाला आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदान महत्त्वाचे असते. सत्ता नसताना महाविकास आघाडीकडे किती आर्थिक ताकद हे महत्त्वाचे आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना महत्त्वाची आहे. त्यापेक्षा शरद पवार व उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची संधी आहे. कारण या निवडणुकीनंतर चार वर्षेतर कुठलेही निवडणूक नाही. या निवडणुकीत चांगली कामगिरी झाली. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ताब्यात आल्या तर त्यांचा जनाधर वाढेल. पण अपयश आल्यास आहे ते लोक सोडून जातील. त्यानंतर पक्षाला उभारी देणे शक्य होणार नाही. ब्यात आल्या तर त्यांचा जनाधर वाढेल. पण अपयश आल्यास आहे ते लोक सोडून जातील. त्यानंतर पक्षाला उभारी देणे शक्य होणार नाही.