Chhagan Bhujbal Takes Oath As Cabinet Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतले आहेत. मंगळवारी (दि.20) राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली. भुजबळांना मंत्रीपद दिल्यानंतर आता अजितदादांचं (Ajit Pawar) यामागे हिडन सिक्रेट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळांच्या मंत्रीमंडळातील वर्णीमागचं समीकरण आणि राजकारण नेमकं काय? हे जाणून घेऊया…
भुजबळांची ओळख म्हणजे मोठा ओबीसी चेहरा
भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आमदार आहेत आणि त्यांना महाराष्ट्राचा एक मोठा ओबीसी चेहरा मानले जाते. पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळ्यात आले होते. त्यामुळे भुजबळ तेव्हापासून नाराज होते. भुजबळ राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात जाणार अशीही जोरदार चर्चा होती. एवढेच काय तर, खुद्द भुजबळांनी जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रेहना असे म्हणत पक्ष सोडण्याचे संकेतही दिले होते.
फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळात कोण-कोण?
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या ४२ वर पोहोचली होती. मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्री शपथ घेऊ शकतात. फडणवीस सरकारमध्ये भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून ९ मंत्र्यांचा समावेश होता. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले होते, जे आता भुजबळ यांच्या माध्यमातून भरले गेले आहे.
युतीत रंगणार कुस्तीचा फड; पालिका निवडणुकांपूर्वीच भाजप महिला नेत्याने टाकला पहिला ‘डाव’
भुजबळांचा राजकीय इतिहास
भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा मानले जातात. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ते गृहमंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. ते शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत ठामपणे उभे आहेत. फडणवीस यांनी डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याबद्दल त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात जाणार अशीही जोरदार चर्चा होती. एवढेच काय तर, खुद्द भुजबळांनी जहाँ नहीं चौना वहाँ नहीं रेहना असे म्हणत पक्ष सोडण्याचे संकेतही दिले होते. मात्र, आता पाच महिन्यांनंतर का होईना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात ग्रँड कमबॅक झाले आहे.
जरांगेंमुळे मंत्रिपदापासून दूर ठेवलं
फडणवीस सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर ज्येष्ठ नेते असूनही भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर, भुजबळांनी मंत्री न केल्याबद्दल नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांना त्यांनी विरोध केल्यामुळे मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आल्याचा दावा त्यावेळी भुजबळांनी केला होता. एवढेच काय तर, मंत्रीपदासाठी मला कोणी थांबवलं याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करत असल्याचेही भुजबळ म्हणाले होते. मंत्रीपदे येतात आणि जातात, पण मला काढून टाकता येत नाही. यासाठी त्यांनी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली होती.
‘…तिथूनच बाळासाहेब अन् माझ्यात दरी निर्माण झाली’; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
भुजबळांच्या कमबॅकचं खरं कारणं वेगळचं
नाराज भुजबळांचे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देऊन पुन्हा जंगी कमबॅक करण्यात आले आहे. मात्र, भुजबळांना मंत्रिपद देण्यामागचं खरं राजकीय गणित वेगळचं आहे. भुजबळांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मतांचे समीकरण बिघडत असल्याचे दिसून आले. त्यात भुजबळांची नाराजी कोण्त्याच पक्षाला परवडणारी नव्हती. तसेच राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर अजितदादांना पाठिंबा देण्यात भुजबळ सर्वात आघाडीवर होते. त्यामुळे भुजबळांना जास्तदिवस नाराज ठेवणे अजित पवारांना परवडणारे नव्हते.
महाराष्ट्रात दीर्घकाळ मराठा समाजाचे नेतृत्त्व
महाराष्ट्राच्या जातीय समीकरणात सर्वात जास्त लोकसंख्या मराठा समाजाची आहे, ज्यामुळे मराठा समाजाने दीर्घकाळ राज्याच्या सत्तेवर नियंत्रण राहिले आहे. राज्यात मराठा लोकसंख्या सुमारे २८ टक्के, दलित १२ टक्के आणि मुस्लिम १२ टक्के आहे. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्या ८ टक्के तर, ओबीसींची लोकसंख्या ३८ टक्के असून, ती वेगवेगळ्या जातींमध्ये विभागली गेली आहे. ब्राह्मण आणि इतर समुदायांची लोकसंख्या ८ टक्के आहे. मुस्लिम ओबीसी जातींचाही ओबीसीमध्ये समावेश आहे.
भारतीय वंशाच्या लोकांना होणार फायदा; गृहमंत्री अमित शाहने लाँच केले नवीन OCI पोर्टल
राज्याचं जातीय राजकारणं कसं?
ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत, ज्यामध्ये तेली, माळी, लोहार, कुर्मी, धनगर, भटक्या, कुणबी आणि बंजारा अशा ३५६ जातींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, दलित जाती महार आणि गैर-महार मध्ये विभागल्या आहेत. महार जाती नव-बौद्ध धर्मात येतात, तर मांग, मातंग, चांभार सारख्या गैर-महार जातींनी नव-बौद्ध धर्म स्वीकारला आहे. राज्याचे राजकारण बऱ्याच काळापासून मराठा विरुद्ध बिगर मराठा या राजकीय समीकरणावर आधारित आहे.
ओबीसींच्या माध्यमातून भाजपचा राजकीय डाव
महाराष्ट्रातील बिगर-मराठा जातींमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, दलित, ओबीसी आणि मुस्लिम जातींचा समावेश आहे. ओबीसींच्या माध्यमातून भाजप महाराष्ट्रात आपली राजकीय मुळे रुजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अजित पवारही ओबीसी मतांवर कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीत. ओबीसी जाती कुणबी, माळी, धनगर, बंजारा, लोहार, तेली, भटक्या, मुन्नार कापू, तेलुगु, पेंटारेड्डी आणि विविध गुज्जर जाती आहेत. अशाप्रकारे ओबीसीमध्ये सुमारे ३५६ जाती आहेत. अजित पवार यांच्याकडे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे ओबीसींचे मोठे चेहरे आहेत. मात्र, मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर, अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देऊन एकप्रकारे जातीचं राजकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.