Supriya Sule meet Mayuresh and Sayali Vanjale in Khadakwasala Constituancy MNS and Ajit Pawar in tantion : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्येच आता पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे राज ठाकरे यांची मनसे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी दोनही पक्ष एकाच वेळी टेन्शनमध्ये आले आहेत. खडकवासलामध्ये नेमकं काय झालं? जाणून घेऊ…
खडकवासलामध्ये नेमकं काय झालं?
खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या भेटीमुळे मोठी राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता आहे. पुणे दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी मयुरेश वांजळे आणि सायली वांजळे यांची भेट घेतली आहे. मयुरेश आणि सायली वांजळे हे मनसेचे माजी आमदार गोल्डमॅन रमेश वांजळे यांची मुलं आहेत.
माझी मातृभाषा ही मराठी पण, विचार उर्दूमध्ये; अभिनेते सचिन पिळगावकरांचं मोठ वक्तव्य
मयुरेश वांजळे सध्या मनसेमध्ये आहेत. तर सायली वांजळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका आहेत. सुप्रिया सुळे या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका रहिवासी सोसायटीमधील कामाचा आढावा घेण्यासाठी आल्या असता त्यांनी वांजळे कुटुंबाची भेट घेतली. ही राजकीय भेट नसल्याचं मयुरेश वांजळे यांनी सांगितलं आहे.
खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार प्रतिहेक्टर; पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर
मात्र, 2024 ची विधानसभा निवडणूक मनसेकडून लढवलेले मयुरेश वांजळे हे निवडणुकीनंतर मनसेत फारसे सक्रिय नाहीत. तर सायली वांजळे या सुद्धा महापालिकेतील कामांसाठी अनेक वेळा सुप्रिया सुळे यांना भेटलेल्या आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी घेतलेली वांजळे कुटुंबाची भेट राजकीय नसली तरी आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मनाली जात आहे.