खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार प्रतिहेक्टर; पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर
CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य

CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार प्रतिहेक्टर मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आहे. आम्ही ताडडीने छोटी मोठी मदत करण्याचे काम केले आहे. जास्त मदत कशी करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. शेतकरी उभा राहिला पाहिजे अशी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे 68 लाख पिकांवर नुकसान झाले आहे. 29 जिल्ह्यात मेजर नुकसान झाले आहे. 2059 क्रॉपत डॅमेज झाले असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमडंळाच्या बैठकीत घेण्यात आले आहे. तसेच 253 तालुक्याना सरसकट मदत देण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. याचबरोबर दिवाळीआधी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार अशी ग्वाही देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसेच शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफ करण्यात येत असल्याची देखील मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच नरेगाच्या माध्यमातून हेक्टरी 3 लाख रूपये दिले जाणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.