Download App

जे तुमच्या मनात ते अमित शाह करणार; विवेक कोल्हेंसाठी फडणवीस, अजितदादांची जोरदार ‘बॅटिंग’

Ajit Pawar : कोपरगावची जागा आमच्याकडे आली. आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली. पण कोल्हे कुटुंबाने मनापासून आशुतोषचे काम केले आहे.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Vivek Kolhe:देशाचे गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) हे रविवारी शिर्डी, कोपरगावच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना व संजीवनी ग्रुपने उभारलेल्या देशातील पहिला सहकारी सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे (Vivek Kolhe)यांच्या राजकीय पुनवर्सनाबाबत उल्लेख केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात कोल्हे कुटुंबांचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले, कोपरगावची जागा आमच्याकडे आली. आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली. पण कोल्हे कुटुंबाने मनापासून आशुतोषचे काम केले आहे. आम्हाला अमित शाह यांनी विचारले ही जागा तुम्हाला दिली आहे. जे कोल्हे कुटुंबाचा मनात आहे ते अमित शाह यांच्या मनात असल्याचे अजितदादा म्हणाले.

औरंगजेबाच्या पाईक असणाऱ्यांमध्ये ही हिम्मत नाही; अहमदनगरच्या नामकरणावरून अमित शहांचा विरोधकांना टोला

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कोल्हे यांच्या राजकीय सोयीबाबत सांगितले. विवेक कोल्हे यांचे युवा नेता म्हणून मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्याकडे नवी व्हिजन आहे. महायुतीमध्ये विधानसभेला आशुतोष काळे हे उमेदवार होते. स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांना मी सांगितले, तुम्ही निवडणूक लढू नका. ते निवडणूक लढले नाही. काळे यांना मदत करून निवडून आणले.

Darjeeling Landslide : मोठी बातमी, मुसळधार पावसामुळे दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला; 7 जणांचा मृत्यू

स्नेहलताताई आणि विवेक भैय्यांची राजकीय काळजी अमितभाई आणि आम्ही घेऊ. ते विसरलेले नाहीत. अभितभाई यांनी गाडीतच विवेक भैय्या आणि ताई भेटायला आल्या होत्या, असे विचारले आहे. त्यामुळे त्यांनी काळजी करू नये, त्यांचे राजकीय भवितव्य उत्तम होईल. तुमचे सध्याचे काम उत्तम सुरू आहे. नातवाने आजोबांसारखे काम केले आहे, असे कौतुकही फडणवीसांनी विवेक कोल्हे यांचे केले आहे.

follow us