Darjeeling Landslide : मोठी बातमी, मुसळधार पावसामुळे दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला; 7 जणांचा मृत्यू

Darjeeling Landslide : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Darjeeling Landslide

Darjeeling Landslide : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर आता पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पश्चिम बंगामधील दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरिक येथे भूस्खलनात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरिक आणि कुर्सियांगला जोडणारा दुधिया लोखंडी पूलही कोसळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले आहे.

7 जणांचा मृत्यू

ढिगाऱ्यातून आधीच सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आम्हाला आणखी दोन जणांची माहिती मिळाली आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असल्याची माहिती दार्जिलिंग (Darjeeling Landslide) जिल्हा पोलिसांचे कुर्सियांगचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिषेक रॉय (Abhishek Roy) यांनी दिली आहे. तसेच गौरीशंकरमध्ये भूस्खलनामुळे रोहिणी रोड बंद झाला असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तर दुसरीकडे आज देखील भारतीय हवामान विभागाने पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दार्जिलिंग (Darjeeling) , कालिम्पोंग, कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरचे मद्यसेवन? ससूनच्या अहवालात मोठा खुलासा 

हवामान विभागाने म्हटले आहे की कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवार सकाळपर्यंत उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.

Coldrif Syrup Ban : मोठी बातमी, दिल्ली, मध्य प्रदेशसह ‘या’ राज्यात कोल्ड्रिफ सिरपवर बंदी

follow us