केदारनाथ मंदिराकडं जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील दोन यात्रेकरुंसह तिघांचा मृत्यू
Landslide at Kedarnath Yatra : केदारनाथ मंदिराकडे जात असताना एक दुर्घटना घडली आहे. येथील चिरबासाजवळ दरड कोसळली. ज्यामध्ये तीन यात्रेकरुंचा मृ्त्यू झाला आहे. तर, आठजण जखमी झाले आहेत. (Landslide) जखमींमध्ये दोन यात्रेकरू महाराष्ट्रातील आहेत. दरम्यान, यातीस जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. (Kedarnath Yatra) उत्तराखंड प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
बांगलादेशात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; १०५ जणांचा मृत्यू, ४०० भारतीय नागरिकांची सुटका
आज ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बचाव पथक देखील दाखल झाले होतं. अद्याप बचावकार्य सुरु आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील किशोर अरुण पराटे (वय ३१) नागपूर महाराष्ट्र, सुनील महादेव काळे (वय २४) जालना महाराष्ट्र, अनुराग बिष्ट, तिलवाडा रुद्रप्रयाग यांचा समावेश आहे.
गौरीकुंड ते केदारनाथ असा १६ किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. यादरम्यान अनेकदा भूस्खलनाच्या घटना घडत असतात. चीरबासा हा भूस्खलन होण्यासाठीच ओळखला जातो. पावसामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असते. मलबा, मोठे दगडं पडल्याने अपघात होत असतात. मागच्या वर्षी अशाच अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच हा मार्ग जोखमीचा म्हटला जातो.
25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार, ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात
या घटनेप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते म्हणालेत की, पहाडी भागात दरड कोसळल्याने काही यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही बातमी दु:खद आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्याचे निर्दश देण्यात आले आहेत. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.