बांगलादेशात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; १०५ जणांचा मृत्यू, ४०० भारतीय नागरिकांची सुटका

बांगलादेशात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; १०५ जणांचा मृत्यू, ४०० भारतीय नागरिकांची सुटका

Dhaka Voilance : बांगलादेशातील आरक्षण (Reservation) आंदोलनाला आता हिंसक वळण लागलय. त्यानंतर प्रशासनाने देशभर संचारबंदी लागू केलीये. दरम्यान, शेख हसीना यांच्या सरकारने संवेदनशील भागांमध्ये लष्करी तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. (Voilance) या हिंसाचारामध्ये विविध ठिकाणांवर आत्तापर्यंत १०५ लोकांचा मृत्यू झालाय. तर आडीच हजारांपेक्षाही अधिक लोक जखमी झाले असल्याची माहिती आहे.

आंदोलकांवर गोळीबार धोतर घातलेल्या शेतकऱ्याला हाकलून देणे नडले ! सरकारच्या दणकाने जीटी वर्ल्ड मॉल बंद

सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी आज देशव्यापी संचारबंदीची घोषणा केली. स्थानिक प्रशासनाला काम करणं अधिक सुलभ व्हावं म्हणून ही संचारबंदी लागू केली जात असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं. देशातील शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आली आहेत. दरम्यान, राजधानी ढाक्यामध्ये आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आला असतानाही अनेक ठिकाणी बेकायदा जमलेल्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आलाय. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करताना लाठीहल्लाही केला. त्यामुळे या आंदोलनाचे लोण देशभरात पसरल आहे.

येथे आरक्षणाला विरोध करत शेकडो विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या असून या आंदोलनामुळे अनेक भागांमध्ये अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाइकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणावरून हे आंदोलन पेटलं आहे. अनेक विद्यार्थी संघटनांनी या आरक्षणाला आक्षेप घेतला आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चारशे भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून, आणखी पंधरा हजार नागरिक त्या देशात सुरक्षितपणे वास्तव्यास असल्याचं सांगण्यात आल आहे.

आक्षेप का आहे? मोठी बातमी! UPSC अध्यक्ष मनोज सोनींचा राजीनामा; 2029 पर्यंत होती मुदत, टायमिंगने खळबळ

देशातील आरक्षणप्रणाली विषमतामूलक असून ती पंतप्रधान शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना लाभदायी ठरणारी असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. ‘बांगलादेश मुक्ती संग्रामा’मध्ये अवामी लीग पक्षाचे मोठे योगदान होतं. त्यासाठीच हे आरक्षण लागू करण्यात आल्याचा आरोप होतो आहे. आरक्षण देताना मेरिटवर आधारित प्रणालीचा वापर करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.

हसीना यांच्याकडून समर्थन

शेख हसीना यांनी मात्र या आरक्षण व्यवस्थेचे समर्थन केलं असून स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाइकांना सन्मान मिळायलाच हवा असं त्यांनी म्हटलं आहे. या आंदोलनाला गुरूवारी हिंसक वळण लागलं होतं. काही आंदोलकांनी ढाक्यातील सरकारी वृत्तवाहिनीच्या मुख्यालयास आग लावली होती. या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचं पाहून शहरातील मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती.

आज दिवसभरात काय घडलं

  • अनेक माध्यमांची संकेतस्थळेही बंद
  • वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणात आडकाठी
  • मध्यवर्ती बँकेच्या संकेतस्थळावर हल्ला
  • पंतप्रधान कार्यालयाची साइटही हॅक
  • नरसिंगदी जिल्ह्यात तुरुंगावर आंदोलकांचे हल्ले
  • हिंसाचारावर भाष्य करण्यास भारताचा नकार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube