China Landslide : चीनमध्ये भीषण दुर्घटना भूस्खलनामुळे 47 हून अधिक लोक ढिगार्याखाली अडकले
China Landslide : चीनच्या युनान प्रांतामध्ये भूस्खलनाची (China Landslide) भीषण दुर्घटना घडली आहे. या मोठ्या दुर्घटनेमध्ये सुमारे 40 हून अधिक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. युनान (Yunan) प्रांतामध्ये सोमवारी सकाळी तब्बल 18 घर जमिनीखाली गाडल्या गेली. त्यामध्ये अनेक जण बेपत्ता झाले आहेत. तर 200 हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अद्यापही युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पोहोचले सेलेब्स: कतरिना-विकीसह अनेक बॉलिवूड स्टार्सची हजेरी
चीनमधील एका वृत्त संस्थेने एक्स सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली की, चीनमधील युनान या ठिकाणी सोमवारी झालेल्या भूस्खलनात एकूण 47 लोक जमिनीखाली गाडले गेले. सध्या या बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी तब्बल 33 अग्निशमन वाहन, दहा लोडिंग मशीनसह 200 हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत.
Ayodhya : महाराष्ट्रातील मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते होणार श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेची महापूजा
दरम्यान चीनचा युनान हा प्रांत डोंगरांनी वेढलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा भूसखलनाच्या दुर्घटना घडत असतात. हा भाग हिमालयाच्या पठारावर उंच पर्वतरांगा असलेल्या डोंगरांनी वेढलेला आहे. मात्र भूस्खलन कशामुळे झालं याचं कारण अद्याप समोर आलेले नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वीच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला मोठा भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला होता. पश्चिम जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले होते. जपान मेटोलॉजिकल एजन्सी (JMA) च्या मते, इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांना भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. त्यातील एका भूंकपाची प्राथमिक तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आलं होतं. या तीव्र भूंकपाच्या धक्क्यांनतर मोठ्या त्सुनामीचा देखील जपानला सामना करावा लागला होता.