Shimala Landslide : हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार! शिमलामध्ये श्रावणी सोमवारीच शिव मंदिरावर कोसळली दरड

Shimala Landslide : हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार! शिमलामध्ये  श्रावणी सोमवारीच शिव मंदिरावर कोसळली दरड

Himachal Pradesh : गेल्या काही दिवसांपासूनच्या मुसळधार पावसादरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये आस्मानी संकट कोसळलं आहे. आज 14 ऑगस्ट रोजी सकाळी शिमलामध्ये मोठं भूस्खलन झालं आहे. शिव बौडी मंदीर येथे हे भूस्खलन झालं आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तसेच मातीच्या ढीगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीतीा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. ( Himachal Pradesh Shimala Landslide shiv mandir due to Heavy rain )

Jailer: थलायवाच्या ‘जेलर’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; 4 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!

या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंद्र सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेनंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान श्रावण महिना आणि त्यात श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांनी येथे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे येथे 50 लोक असल्याचंही सांगण्यात येत आहे.

भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच; संभ्रम तयार करु नका! पवारांनी राऊतांना फटकारलं

दरम्यान हिमाचलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचं तांडव सुरू आहे. त्यामध्ये गेल्या 24 तासांत विविध दुर्घटनांमध्ये राज्यात 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, राज्यातील जनतेने घराबाहेर पडताना काळजी घ्यायची आहे. तसेच धोकादायक ठिकांणी वावरताना काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. राज्यात पाऊस आणि दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ऑरेंन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube