Jailer: थलायवाच्या ‘जेलर’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; 4 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!
![Jailer: थलायवाच्या ‘जेलर’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; 4 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई! Jailer: थलायवाच्या ‘जेलर’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; 4 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/08/letsupp-image-2023-08-10T112158.181.jpg)
Jailer Box Office Collection: थलायवाच्या म्हणजेच रजनीकांत (Rajinikanth) यांचा बहुचर्चित सिनेमा ‘जेलर’ (Jailer) गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांकडून या सिनेमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. (Box Office Collection) कमाईच्या बाबतीमध्ये या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनोखा रेकॉर्ड बनवला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने ५० कोटींची कमाई करत पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केला होता.
View this post on Instagram
आता या सिनेमाच्या चौथ्या दिवशी देखील कमाईचे आकडे समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ‘जेलर’ने पहिल्या दिवशी ५२ कोटी रुपयांची कमाई मोठी केली होती. यामध्ये तामिळनाडूत २३ कोटी, कर्नाटकमध्ये ११ कोटी, व केरळमध्ये ५ कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून १० कोटी आणि इतर राज्यात ३ कोटी रुपयांचा समावेश करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २७ कोटींचा गल्ला कमावला आहे. तसेच तिसऱ्या दिवशी या सिनेमाने ३४.३ कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय केला होता.
आता चौथ्या दिवशी या सिनेमाने ३८ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. केवळ ४ दिवसामध्ये या सिनेमाने देशात ३०० कोंटीचा गल्ला कमावला आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत तब्बल मोठं मोठे विक्रम थलायवाने मोडीत काढले आहे. सिनेमाची वाढती कमाई बघता बॉक्स ऑफिसवर थलायवाची जादू आपल्याला अनुभवायला मिळत आहे.
Box Office Collection: ‘ओएमजी-2’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; आतापर्यंत कमावले ‘इतके’ कोटी
महाराष्ट्रामध्ये ९०० स्क्रीनवर हा सिनेमा दाखवला जात आहे. नेल्सन दिग्दर्शित या सिनेमामध्ये थलायवा ‘जेलर ‘टायगर’ मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू यांच्याही मुख्य भूमिका पाहायला मिळत आहेत. या सिनेमात मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांनीही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे.