धमाकेदार ओपनिंगनंतर ‘गदर 2’ YouTube वर लीक; दोन दिवसांत दमदार कलेक्शन

धमाकेदार ओपनिंगनंतर ‘गदर 2’ YouTube वर लीक; दोन दिवसांत दमदार कलेक्शन

‘Gadar 2’ leaked on YouTube : बॉलिवूड अभिनेता सनी पाजी आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर चित्रपट ‘गदर 2’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट उत्तम कलेक्शन करत आहे. सनी देओलचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.

‘गदर 2’मध्ये सकीना आणि तारा सिंगची जोडी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या वीकेंडमध्येच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा ओलांडू शकतो, असे बोलले जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. हा संपूर्ण चित्रपट यूट्यूबवर लीक झाला आहे. सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटाला पायरसी साइट्सचा मोठा फटका बसला असून त्याचा परिणाम कमाईवर होणार आहे.

एचडी प्रिंटमध्ये YouTube वर चित्रपट लीक
दरम्यान ‘गदर 2’ यूट्यूबवर एचटीडी 3 स्टार बॉईज नावाच्या चॅनलवर लीक झाला होता. मात्र, या चॅनलवर आल्यानंतर केवळ 4 तासच हा चित्रपट पाहता येणार होता, त्यानंतर हा चित्रपट वाहिनीवरून हटवण्यात आला आहे. याशिवाय तमिलरॉकर्स, मूवीरुल्झ, फिल्मझिला, टेलिग्राम यांसारख्या साइटवरही हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

शरद पवारांकडून अजितदादांना ‘इंडिया’ बैठकीचं निमंत्रण? गुप्त भेटीवर राऊतांचं वेगळचं लॉजिक

गदर 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘गदर 2’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40.10 कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 43 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकूण 83 कोटींची कमाई केली आहे. पाच दिवसांच्या दीर्घ वीकेंडमध्ये चित्रपट 175 कोटींचा टप्पा ओलांडू शकतो.

CM शिंदेंच्या ठाण्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; महापालिका रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

चित्रपटाची स्टार कास्ट
चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल, अमिषा पटेल यांच्याशिवाय उत्कर्ष शर्मा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर’ हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘गदर 2’ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘OMG 2’शी झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube