CM शिंदेंच्या ठाण्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; महापालिका रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

CM शिंदेंच्या ठाण्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; महापालिका रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच एक धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 13 रुग्ण आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. याआधी पाच दिवसांपूर्वीच इथे एका रात्रीत 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अपुऱ्या आरोग्य सुविधा, गोंधळ आणि डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफची कमी संख्या यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. (17 patients have died in one night in Chhatrapati Shivaji Maharaj Hospital of Thane Municipal Corporation)

ठाणे महानगरपालिकेची छोटी आणि मोठी मिळून जवळपास 23 रुग्णालय आहेत. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेज ही दोन प्रमुख आणि मोठी रुग्णालयं समजली जातात. मात्र या रुग्णालयांमध्ये मागील काही दिवसांपासून आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप नागरिकांकडून होतं आहे. अशात ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग पाडून तिथे नवीन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचे काम सुरु आहे. सिव्हिल हॉस्पिटल बंद असल्याने इथले रुग्णही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे आरोग्य सुविधेवर मोठा ताण येत असल्याचे दिसून येत आहे.

स्ट्रीट फर्निचरमधील वस्तुंचे दर तुम्ही ठरवले का? आदित्य ठाकरेंचा आयुक्तांना थेट सवाल

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अनागोंदी आणि डॉक्टरांच्या संख्येबाबत सवाल उपस्थित केला होता. यानंतर आज 17 रुग्णांचे मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच आव्हाड म्हणाले, या प्रकाराची गांभीर्याने दखल ठाणे महानगरपालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं.

आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी राष्ट्रवादी कांग्रेस मागणी करीत आहोत, असंही आव्हाड म्हणाले.

Ashish Shelar : युती कुणामुळे तुटली?, खडसेंना फैलावर घेत शेलारांचा ठाकरेंना करेक्ट मेसेज

ठाणे महापालिकेवर मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. याशिवाय ठाण्याचे एकनाथ शिंदे हेच सध्या राज्याचे विद्यमान प्रमुख आहेत. सोबतच ते फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये मिळून साडे सात वर्षे मंत्री होते. यानंतरही रुग्णयलायांच्या अवस्थेवरील प्रश्नचिन्ह आणि 17 रुग्णांचा मृत्यू होणं ही धक्कादायक बाब मानली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube