Ashish Shelar : युती कुणामुळे तुटली?, खडसेंना फैलावर घेत शेलारांचा ठाकरेंना करेक्ट मेसेज

Ashish Shelar : युती कुणामुळे तुटली?, खडसेंना फैलावर घेत शेलारांचा ठाकरेंना करेक्ट मेसेज

Ashish Shelar criticized Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजप आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप जोरात सुरू झाले आहेत. भाजप-शिवसेना ही अनेक वर्षांपासूनची युती कुणामुळे तुटली हा मुद्दा चर्चेत आला असून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना जबाबदार धर आहेत. त्यानंतर आता या मुद्द्यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी युती शिवसनेमुळेच तुटली असा दावाकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिले. शेलार यांनी मुंबई तकच्या चावडी कार्यक्रमात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली.

Devendra Fadanvis : पुणे विचारवंतांचे शहर, इथे निर्णय घेणे अवघड; पुणेकरांना फडणवीसांचे मिश्किल टोले

शेलार म्हणाले, उद्धवजींचे खेळ आणि चाळे, हेतू पाहून त्यांच्या मनात त्यावेळी काय सुरू होतं हे लहान बालकही सांगू शकत होतं. मला वाटतं त्याही वेळेला उद्धवजी अहंकारापोटी, तिरस्कारापोटी आणि मीच शहाणा या भूमिकेपोटी भाजपला हिडीसफिडीस करत होते. आज त्यांच्या पक्षाची झालेली अवस्था ही त्यांच्या अहंकारी वागण्यातूनच झाली आहे, अशी जळजळीत टीका शेलार यांनी केली.

एकनाथ खडसे जे बोलले ते पूर्ण खोटं

यानंतर त्यांनी एकनाथ खडसे यांनाही फैलावर घेतलं. मला वाटतं एकनाथ खडसे आज जे बोलत आहेत ते अर्ध खोटं नाही तर पूर्ण खोटं आहे. याच कारण थोडं मागे गेलं तर सहज लक्षात येईल. आमचे 151 प्लस ही घोषणा आदित्य ठाकरे यांनी परस्पर केली होती. तशी बॅनरबाजीही केली गेली. युतीच्या जागावाटपाची चर्चाही झालेली नव्हती. याचा अर्थ आम्ही तुम्हाला मोजतच नाही. 151 माझे शिवसेनेचे. या अहंकारात आदित्य आणि उद्धव ठाकरे होते. हा घटनाक्रम खडसे विसरले असतील.

केंद्राचं लक्ष पुण्यावर पण, महिलांचा प्रश्न गंभीरच; चांदणी चौक लोकार्पण सोहळ्यात गोऱ्हेंची नाराजी

गोपीनाथ मुंडेंनी घटकपक्षांना महायुतीत जोडलं होतं. पण, उद्धवजी मात्र घटक पक्षात फूट पाडण्याचे काम करत होते. युतीत असतानाही सहकार पक्षाच्या नेत्यांना फोडून किंवा बाजूला घेऊन त्यांच्याशी चर्चा करायची. हे त्यांच्या पक्षाचे चाळे होते.

शिवसेनेकडून युती तुटल्याची पहिली प्रतिक्रिया

खडसे यांच्या पत्रकार परिषदेच्या आधी ओम माथूर यांच्या घरी दिवाकर रावते, अनिल देसाई बसले होते. आणखी काही जागा मिळतील का यासाठी ते आले होते. दुसऱ्या मजल्यावर देवेंद्रजी, ओम माथूर आणि विनोद तावडे, मी असे बसलो होतो. जी जागा मागितली जात होती तिकडचा माणूस त्याच्याशी परस्पर बोललं जात होतं. त्यामुळे जागांच वाटप काही होत नव्हतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हेतू अन् उद्देश अप्रामाणिक दिसत होता. दिवाकर रावते, देसाई किती वेळ लागतोय असे म्हणत खाली उतरून त्यांनी मीडियाला पहिली प्रतिक्रिया दिली की कसली युती, काय आहे. त्यामुळे खडसे जे बोलले ते पूर्ण सत्य नाही, अस शेलार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube