केंद्राचं लक्ष पुण्यावर पण, महिलांचा प्रश्न गंभीरच; चांदणी चौक लोकार्पण सोहळ्यात गोऱ्हेंची नाराजी

केंद्राचं लक्ष पुण्यावर पण, महिलांचा प्रश्न गंभीरच; चांदणी चौक लोकार्पण सोहळ्यात गोऱ्हेंची नाराजी

Nilam Gorhe : चांदणी चौक हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकारचं अभिनंदन. तुम्ही रस्ते नाही तर देशाची बांधणी या माध्यामातून करत आहात. मात्र प्रत्येक ठिकाणी रस्त्यांबरोबर स्वच्छातागृह आणि प्रसाधन गृह त्याच वेगाने बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ प्रयत्न करतय असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण मुंबई-पुणे, पुणे-सोलापूर आणि इतर महामार्गांवर वेगाने स्वच्छातागृह आणि प्रसाधनगृह बांदली गेली. तर महिला देखील सुखाने प्रवास करू शकतील. असं मला वाटतं. असं विधान परिषद सभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या. त्या पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होत्या. ( Nilam Gorhe Speech in Chandni Chowk Inauguration of Pune )

Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी अन् जसराज जोशीची लग्नगाठ; फोटो शेअर करत म्हणाली…

काय म्हणाल्या निलम गोऱ्हे?

चांदणी चौक लोकार्पण सोहळ्यात बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘ 2019 च्या फेब्रुवारीमध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होत. तर आता हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकारचं अभिनंदन. तुम्ही रस्ते नाही तर देशाची बांधणी या माध्यामातून करत आहात. रस्ते हे दैनंदीन जीवनातील आरोग्य, पाणी, दळणवळणासाठी महत्ताची भूमिका बाजावतात. बाळासाहेब ठाकरेंचे अनेक लाडकी व्यक्तिमत्त्व होती. त्यात नितीन गडकरींवर त्यांचा विशेष स्नेह होता. ते नेहमी रस्त्यांच्या बाबतीत नितीन गडकरींशी बोलत. तर महाराष्ट्रातील पुणे-मुंबई महामार्ग तसेच देशातील इतर महामार्गांच्या माध्यामातून आपला देश चेहरा मोहरा बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाकडे आपण जात आहोत.

Karnataka Politics : विधानसभेत 135 जिंकल्या, लोकसभेत किती? मुख्यमंत्र्यांनी थेट आकडाच सांगितला

केंद्राचं लक्ष पुण्यावर…

पुढे त्या म्हणाल्या की, अशी नेहमी बातमी असते की, पुण्यावर महाराष्ट्र आणि केंद्राचं फार लक्ष आहे. येथील खासदार, आमदारांसह केंद्र आणि राज्य सरकार येथील जनतेला कायम खूश ठेवतात. येथे थोडं जरी खुट्ट झालं तरी त्याची तात्काळ दखल घेतली जाते. तसेच नागपूरकर आणि पुणेकर यांच्या नात्याबद्दल देखील जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असते. कारण नागपूरच्या पाहुणचाराचं कौतुक होत. तर पुण्याच्या पाहुणचारावर कमेंट केल्या जातात. मात्र या चांदणी पुलावर त्यांचा संगम झाला आहे.

पण महिलांचा प्रश्न गंभीरच…

तसेच त्यांनी यावेळी महिलांच्या स्वच्छातागृहाचा मुद्दा या भाषणात उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, प्रत्येक ठिकाणी रस्त्यांबरोबर स्वच्छातागृह आणि प्रसाधन गृह त्याच वेगाने बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ प्रयत्न करतय असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण मुंबई-पुणे, पुणे-सोलापूर आणि इतर महामार्गांवर वेगाने स्वच्छातागृह आणि प्रसाधनगृह बांदली गेली तर महिला देखील सुखाने प्रवास करू शकतील असं मला वाटतं.

पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. चांदणी चौकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषद सभापती निलम गोऱ्हे हे उपस्थित आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. पुणेस्थित पुणे-बैंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारला असून या चौकात कायमच वाहतूक कोंडी होत असत. त्यामुळे 1 ऑक्टोबरला जुना पूल पाडण्यात आला होता. त्यांचं आज लोकार्पण करण्यात आलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube