Devendra Fadanvis : पुणे विचारवंतांचे शहर, इथे निर्णय घेणे अवघड; पुणेकरांना फडणवीसांचे मिश्किल टोले
Devendra Fadanvis : ‘या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडले? हे अजित पवारांनी सांगितले. मला वाटत होते इथे वाहतूकोंडीत अडकून लोकाना दिवसा चांदण्या दिसायच्या म्हणून चांदणी चौक हे नाव पडले. अजित पवारांनी माझ्या ज्ञानात भर घातली. तर गुगलवर शोधल्यावर दिल्लीचा नाही तर पुण्याचा चांदणी चौक येतो. असं अजित पवार म्हणाले त्यावर फडणवास म्हणाले, कारण गुगलही तुमच्याच ताब्यात आहे. असं म्हणत चांदणी चौकाच्या नावावर मिश्किल टोला लागावला. ते पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते.
( Ajit Pawar explain and Devendra Fadanvis joke on Pune Chandni Chowk name Inauguration by Nitin Gadkari)
Kshitij Patwardhan: गौरीच्या कहाण्या ऐकून कधी रडलो, घाबरलो; Taali चा लेखकाची ‘ती’पोस्ट चर्चेत!
काय म्हणाले फडणवीस?
‘या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडले? हे अजित पवारांनी सांगितले. मला वाटत होते इथे वाहतूकोंडीत अडकून लोकाना दिवसा चांदण्या दिसायच्या म्हणून चांदणी चौक हे नाव पडले. अजित पवारांनी माझ्या ज्ञानात भर घातली. तर गुगलवर शोधल्यावर दिल्लीचा नाही तर पुण्याचा चांदणी चौक येतो. असं अजित पवार म्हणाले त्यावर फडणवीस म्हणाले, कारण गुगलही तुमच्याच ताब्यात आहे. असं म्हणत चांदणी चौकाच्या नावावर मिश्किल टोला लागावला.
Hemant Dhome: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो शेअर करत हेमंत ढोमे संतप्त; म्हणाला…
पुढे फडणवीसांनी म्हटलं की, पुणे हे विचारवंतांचे शहर आहे. इथे निर्णय घेणे सोपे नाही. एखाद्या प्रकल्पासाठी लोक तीन वेगवेगळ्या देशातील संस्थांचे रिपोर्ट आणतात. पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोपेक्षा आधी सुरु झाले होते. मात्र पुर्ण आधी नागपूरचे झाले. तसेच यावेळी फडणवीसांनी पुणे मेट्रोच्या वन कार्ड विषयी माहिती सांगितली. ते म्हणाले हे कार्ड मुंबई, नागपूर आणि दिल्ली मेट्रोमध्येही वापरता येणार आहे.
त्याचबरोबर फडणवीसांनी यावेळी पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील बोलले. ते म्हणाले, पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे. कारण आताचा एअरपोर्ट सैन्याचा आहे त्यामुळे विमानाच्या उड्डाणांवर बंधने येतात. आता अजितदादा सोबत आहेत त्यामुळे पुरंदर एअरपोर्टच्या जमीन अधिग्रहणाला वेग येईल. पुण्यात जर आधी एअरपोर्ट झाले असते तर पुण्याचा विकासदर दोन टक्क्यांनी आणखी वाढला असता. पुण्यात आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट झाले तर इथल्या आय टी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक येईल.
आता आमाच्या सोबत पुण्यावर प्रेम असलेले तडफदार अजित पवार आहेत. त्यामुळे पुण्याच्या विकासाला गती येईल. त्याच बरोबर पंतप्रधान मोदींचही पुण्यावर प्रेम आहे. आतापर्यंतच्या पंतप्रधानांपैकी मोदीच पुण्यात जास्त आले आहेत. असं म्हणत त्यांनी
पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. चांदणी चौकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषद सभापती निलम गोऱ्हे हे उपस्थित आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. पुणेस्थित पुणे-बैंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारला असून या चौकात कायमच वाहतूक कोंडी होत असत. त्यामुळे 1 ऑक्टोबरला जुना पूल पाडण्यात आला होता. त्यांचं आज लोकार्पण करण्यात आलं.