Kshitij Patwardhan: गौरीच्या कहाण्या ऐकून कधी रडलो, घाबरलो; Taaliच्या लेखकाची ‘ती’पोस्ट चर्चेत!

Kshitij Patwardhan: गौरीच्या कहाण्या ऐकून कधी रडलो, घाबरलो; Taaliच्या लेखकाची ‘ती’पोस्ट चर्चेत!

 Taali Web Series : ‘ताली’ (Taali) ही आगामी वेबसीरिज सध्या जोरदार चर्चेत येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) या सीरिजमध्ये गौरी सावंतयांची भूमिका साकारली आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) याने केले आहे. आता या सीरिजच्या पडद्यामागील आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kshitij Patwardhan (@kshitijpatwardhan)


नेमकं काय लिहिले आहे?
२०१४-१५ ला पुणं सुटलं. कट्टे सुटले, गप्पा सुटल्या, मुंबईत असं चालतं याच्या ऐकीव चर्चा सुटल्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अनेक लोकांच्या माझ्याबद्दलच्या समजातून, ग्रहातून सुटलो. एक म्हणजे मुंबईत अजून वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायची तीव्र इच्छा होती, आणि दुसरं पुण्यात सुखवस्तू, गोड आणि एकाच प्रकारच्या गोष्टी करून कंटाळलो होतो. मुंबईतली हि पुढची वर्ष आपल्याला आव्हान देणाऱ्या कथा शोधण्यात गेली. त्यात काही फसली, काही वर्क झाली.

२०१९ च्या सुरुवातीला असंच हे आव्हान आलं, गौरी सावंत यांच्या आयुष्यावर मराठी सिनेमा काढायचं. आजवर तृतीयपंथी समाजाला आपल्या सिनेमात बीभत्स, नकारात्मक किंवा विनोदी याच पठडीत सादर केलं गेलंय. मला वाटलं हि ते मोडायची खूप चांगली संधी आहे, कारण हि एका मुलाची गोष्ट आहे ज्याला आई व्हायचंय! हि एका आईची गोष्ट आहे, जी तृतीयपंथी आहे. निर्माती अफीफा नाडियादवाला हिने जबरदस्त पाठपुरावा करून हे मार्गी लावलं, आणि मी आणि समीर मिळून धुरळा नंतर हि गोष्ट मराठी करणार अशी अनाउन्समेंट सुद्धा झाली. गौरीला भेटलो आणि तिच्या एकेक कहाण्या ऐकून कधी रडलो, कधी थक्क झालो, कधी घाबरलो सुद्धा. ज्या गोष्टीचा आपण विचारही करू शकत नाही ती गोष्ट ती जगलीये, आणि आपल्याला त्या बद्दल लिहायचंय हे खूप मोठं आव्हान होतं. आख्खा मराठी सिनेमा लिहिला, त्याचं प्रेसेंटेशन तयार केलं, खूप लोकांना पाठवलं, अभिनेत्यांची नावं काढली, पुढचे ६ महिने उत्तराची फक्त वाट पाहिली, मग पहिला धक्का बसला… Lockdown नावाचा….

OMG 2 Gadar 2 Release : ‘ओएमजी 2’ च्या पोस्टरवर दूध, सनीच्या ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स; प्रेक्षकांचा धुमाकूळ

पुढचं उद्याच्या भागात…
शिकायला हे मिळालं कि तुम्ही कितीही पटकन लिहिलं तरी लोकं ते पटकन वाचत नाहीत, ते त्यांच्या वेळेने, सोयीने, आणि सवडीने त्यावर व्यक्त होतात आणि व्यक्त झाले म्हणजे ते करतात असं नाही. एखाद्या स्क्रिप्ट वर ‘Interesting’ हा शब्द ‘नाही’ पेक्षा धोकादायक आहे हे कळलं ते याच वेळी!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube