स्ट्रीट फर्निचरमधील वस्तुंचे दर तुम्ही ठरवले का? आदित्य ठाकरेंचा आयुक्तांना थेट सवाल

स्ट्रीट फर्निचरमधील वस्तुंचे दर तुम्ही ठरवले का? आदित्य ठाकरेंचा आयुक्तांना थेट सवाल

Street furniture scam : मुंबईकरांना बगीचा, फुटपाथसह अन्य ठिकाणी बसण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी महानगरपालिकेतर्फे स्ट्रीट फर्निचर (Street furniture) बाके बसवण्याच्या कामे सुरू केली होती. यासाठी एकूण 263 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) या प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप करून रान उठवलं आहे. हे प्रकरण लावून धरत त्यांनी भाजप सरकारवर टीकेच झोड उठवली. आता त्यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केला. स्ट्रीट फर्निचरमधील वस्तुंचे दर तुम्ही ठरवले का? असा सवाल त्यांनी केला. (Aditya Thackeray letter to Iqbal Singh Chahal over Street furniture scam)

या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात फर्निचरमध्ये 70 टक्के वस्तू जादा दराने खरेदी केल्याचं समोर आलं. त्यांनंतर आता आदित्य ठाकरेंनी आयुक्त चहल यांनी काही सवाल केले होते. सर्व दर ‘कॉम्पिटिटीव्ह प्राधिकरणाने’ ठरवले होते, म्हणजे आपण का? जर तुम्ही या फाईलवर स्वाक्षरी केली असेल तर तुम्हालाही या प्रश्नाला सामोरे जावे लागेल का? असा थेट सवाल त्यांनी केला.

आदित्य ठाकरेंचं जसंच्या तसं पत्र-
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने स्ट्रीट फर्निचर मध्ये केलेला घोटाळा मी जनतेसमोर आणला आहे, मुंबईकरांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मी ह्या पत्राद्वारे तुम्हाला काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो :
१. या तपासाची पद्धत काय आहे ? तसेच महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंतर्गत तपासणी करण्यात येणार की बाहेरील संस्थेकडून किंवा कायदेशीर तपासणी करण्यात येणार आहे?
२. DMC, ज्यांच्या माध्यमातून ही निविदा प्रक्रिया सुरू केली आणि जे अजूनही आम्हाला उत्तर देत आहेत, त्यांची विभागीय चौकशी होणार आहे का?
३. ज्यांनी दरांबाबत बाह्य माहिती दिली आहे. (आम्हाला दिलेल्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे शहरी नियोजक आणि डिझाइनर), ते या तपासणीचा भाग असतील का?
४. समितीचा एक भाग म्हणून, सहाय्यक आयुक्त या तपासाचा भाग असतील का?
५. मला आधीच्या पत्रात उत्तर मिळाल्याप्रमाणे, सर्व दर ‘कॉम्पिटिटिव्ह अथॉरिटी ने ठरवले होते, म्हणजे आपण का? आपण जर या फाईल वर सही केली असेल, तर आपण देखील या चौकशीला सामोरे जाणार का?

असे सवाल आदित्य ठाकरेंनी केले. आदित्य यांनी लिहिलं की, मला तुमच्याकडून थेट उत्तराची आशा आहे, ते न मिळाल्यास माझ्या राज्याच्या हितासाठी, मला महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकाराचा वापर करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube