भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच; संभ्रम तयार करु नका! पवारांनी राऊतांना फटकारलं

भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच; संभ्रम तयार करु नका! पवारांनी राऊतांना फटकारलं

पुणे : भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच. त्यामुळे एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या भेटीबद्दल आणि इतर काही मुद्द्यांवरही सविस्तर भाष्य केले. (Sharad Pawar clarified that he will not go with BJP even after meeting Ajit Pawar)

शरद पवार म्हणाले. संभ्रम वगैरे काही नाही. महाविकास आघाडीत आम्ही तिन्ही पक्ष विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणत्याही प्रकारे सहभाग नाही, ही भूमिका स्पष्ट झाल्यावर संभ्रम राहिलेला नाही. एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करू नका. मी जे सांगत आहे, तेच माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राऊतांनी पवारांशी पंगा घेतलाच; तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची का?

जयंत पाटलांसाठीही भाजपचे प्रयत्न सुरु :

जयंत पाटील यांचे भाऊ भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याचे कानावर आहे. सत्तेचा गैरवापर करून ही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटिसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न आता जयंत पाटील यांच्याबाबतही घडत आहे. पण ते आपल्या विचारांवर ठाम राहतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. तसंच कालच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न :

यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाष्य केलं. ते म्हणाले, टोमॅटोचे भाव वाढले, त्यातून शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळत असताना, केंद्र सरकार नेपाळकडून टोमॅटो खरेदी करत आहे. शेतकरी उत्पादक आहे, त्याला दोन पैसे जास्त मिळत असतील तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी, त्याला यातना कशा देता येतील ही भूमिका राज्यकर्ते घेत आहेत. अशा प्रकारे टोमॅटो आयात करणं हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण होईल :

अजित पवार आणि शरद पवारांच्या या भेटीमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या भेटीमुळे मविआमध्ये धूसफुस वाढू शकते. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्मपितामहकडून होता कामा नये. रोहित पवारांचंही नातीगोती सांभाळायची वगैरे वक्तव्य ऐकलं. पण मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचं? हा प्रश्न आहे. आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का? असा सवाल करत संजय राऊत यांनी संशय आणि संभ्रम निर्माण होतं असल्याचं म्हंटलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube