राऊतांनी पवारांशी पंगा घेतलाच; तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची का?

  • Written By: Published:
राऊतांनी पवारांशी पंगा घेतलाच; तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची का?

Sanjay Raut Attack On Sharad Pawar Ajit Pawar Meet Row :  राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर एकीकडे राजकारण ढवळून निघालेले असताना, शनिवारी (दि.12) अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीमुळे त्यात अधिकची भर पडली आहे. याच भेटीवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परखड मत व्यक्त करत थेट पवार कुटुंबीयांनाच खडा सवाल विचारला आहे. त्यांच्या या विधानामुळे राऊतांनी एकप्रकारे पवार कुटुंबीयांशी आणि शरद पवारांशी पंगा घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार आणि शरद पवारांच्या या भेटीमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या भेटीमुळे मविआमध्ये धूसफुस वाढू शकते. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्मपितामहकडून होता कामा नये.

गंमतभेटींसाठी महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही; सामनातून टीकास्त्र

संप्तत सवाल उपस्थित करत राऊत म्हणाले की, रोहित पवारांचंही नातीगोती सांभाळायची वगैरे वक्तव्य ऐकलं. पण मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचं? हा प्रश्न आहे. आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का? असा प्रश्न विचारत हे आमच्या डीएनएत नाही असे राऊतांनी म्हटले. परंतु, अशा प्रकारची कृती भीष्म पितामहकडून होता कामा नये, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

भेटीवर काय म्हणाले शरद पवार

दरम्यान, अजितदादा आणि पवारांच्या भेटीमुळे मविआमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले असून, या बैठकीवर पवारांनी मौन सोडले आहे. ते म्हणाले की, अजितदादा माझे पुतणे आहेत. पवार कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती मी असल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.

भाजपकडून शरद पवारांना केंद्रीय कृषी मंत्रिपदाची ऑफर; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट…

भांडायचं हे ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही – राऊत

नातीगोती व्यवहार सांभाळायची, कार्यकर्त्यांनी विचारधारेसाठी भांडायचं हे ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही. ही लढाई देशासाठी आहे. महाभारताप्रमाणे स्वकीय असो की परकीय, लढाई ही लढाई असते. राज्याच्या अस्मिता आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे.

आम्ही अंतर राखूनच

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी आमचाही दोस्ताना होता. पण राजकारणात आम्ही वेगळे आहोत याचे भान ठेवूनच आम्ही त्यांच्याशी अंतर राखून असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube