गंमतभेटींसाठी महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही; सामनातून टीकास्त्र

गंमतभेटींसाठी महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही;  सामनातून टीकास्त्र

Samana Sanjay Raut : ‘राजकारणातील डिजीटल युगात काहीच गुप्त राहत नाही. त्यामुळेच चार दिवसांपूर्वी जेव्हा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महाराष्ट्रतील नेतृत्त्व बदलावर गुप्त खलबतं झाली. त्यानंतर ही बातमी फुटली आणि त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेचा आजार बळावला. हे शिंदे गटाने गांभीर्याने घेतेले पाहिजे.’ अशी टीका आजच्या सामानातून करण्यात आला. ( Samana Criticize sharad pawar and ajit pawar meeting )

Independence day : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधित

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची एक गुप्त बैठक झाली. एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचा उरलेला गटही सत्तेत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून आजच्या शिवसेनेचे मुखपत्र सामनातून या भेटीवर टीक करण्यात आली.

… तर आम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवावी लागेल; शिंदेंच्या आमदाराचं मोठं वक्तव्य

त्याचबरोबर यामध्ये पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राला हा रोग लागला आहे. तो लवकर बरा होणे गरजेचे आहे. तसेच अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश आणि जर्जर झाला आहे. त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. या सागळ्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहिल. तर दोन पवारांची गंमतभेट आणि मुख्यमंत्री शिंदेचा आजार बळावला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही हे आम्ही येथे परखडपणे बजावत आहोत. अशी टीका देखील यावेळी सामनातून करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube