भाजपकडून शरद पवारांना केंद्रीय कृषी मंत्रिपदाची ऑफर; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट…
Prithivraj Chavhan on sharad pawar : भारतीय जनता पक्षाने शरद पवारांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि निती आयोगाच्या चेअरमन पदाची ऑफर दिली आहे. त्याबद्दल सांगण्यासाठीच अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. त्यात त्यांनी ही ऑफर शरद पवारांना दिली. मात्र पवारांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे. असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. (BJP offered sharad pawar Union Agriculture Ministry and NITI aayog Chairmanship Prithivraj Chavhan statement)
Ghoomar: अभिषेक बच्चनचा ‘घुमर’ मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठरला सुपरहिट!
त्याचबरोबर त्यांनी असाही गौप्यस्फोट केला आहे की, या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील होते. त्यांना देखील अजित दादांनी आपल्या गटात सामील करण्याची ऑफर दिली आहे. या संदर्भात नुकतेच अजित पवार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. असंही चव्हाण म्हणाले आहेत.
WI vs IND : वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने मालिका गमावली; या पराभवाची मुख्य कारणे काय ?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची एक गुप्त बैठक झाली. ही बैठक अतुल चोरडिया या उद्योगपतीच्या घरी झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचा उरलेला गटही सत्तेत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून राज्यातील विविध नेत्यांकडून टीका केली जात आहे. तर कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी या भेटी बाबत असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.