Ghoomar: अभिषेक बच्चनचा ‘घुमर’ मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठरला सुपरहिट!

Ghoomar: अभिषेक बच्चनचा ‘घुमर’ मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठरला सुपरहिट!

Ghoomar: ‘घूमर’ सिनेमात अभिनेत्री सैयामी खेरने पॅरा स्पोर्ट्स खेळाडूची भूमिका साकारली आहे. जो डावखुरा गोलंदाज आहे. त्याचवेळी अभिषेक बच्चन त्याच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसून आला आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन व्यतिरिक्त सैयामी खेर, शबाना आझमी आणि अंगद बेदी यांच्याही भूमिका महत्वाच्या आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hope Productions (@hopeprodn)


टीम ‘घुमर’ सध्या जोरदार प्रमोशन करत असताना या सिनेमाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Melbourne Film Festival) झाला आणि या सिनेमाने सगळ्यांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवल. दिग्दर्शक आर बाल्की (Directed by R Balki) यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सयामी खेर अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका यात पाहायला मिळणार आहेत. क्रिकेटवर आधारित असलेला हा सिनेमा अनेक भावनांनी गुंफलेला आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर (box office) अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नुकतेच सनी पाजीचा ‘गदर २’ आणि खिलाडीचा ‘ओएमजी २’ हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले. आता यांच्यापाठोपाठच अभिषेक बच्चनचा ‘घुमर’ हा सिनेमा सुद्धा रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. घूमरमध्ये आकर्षक कथा त्यांच्या दूरदर्शी दिग्दर्शनामुळे हा सिनेमा नक्कीच काहीतरी अनोखा असणार असल्याची चर्चा आहे.

Johnny Lever birthday : …म्हणून मुलासाठी चित्रपटांतून संन्यास घेत जॉनी लिव्हर झाले होते धर्मगुरू

अभिषेक बच्चनला ट्रेलर लाँच विचारण्यात आले ‘घूमर’ त्याच्यासाठी गेम चेंजर ठरेल का? तेव्हा अभिषेक बच्चनने उत्तर दिले आणि म्हणाला” प्रत्येक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेमाशी संबंधित असलेल्या सर्वांसाठी शुक्रवार प्रत्येकाचे भविष्य ठरवतो. प्रत्येक सिनेमा हा मेक किंवा ब्रेक सिनेमा असतो. प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतात आणि प्रेक्षकांना तुम्हाला आणखी बघायचे आहे का हे शुक्रवारी ठरते. प्रत्येक सिनेमा हा सिनेमाशी संबंधित असलेल्या प्रत्येक कलाकारासाठी मेक किंवा ब्रेक सिनेमा असतो. घूमर वेगळा नाही कारण तो सारखाच आहे.

टीम घुमर सध्या जोरदार प्रमोशन करत असताना या सिनेमाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. त्यावेळी या सिनेमाने सगळ्यांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवले. दिग्दर्शक आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा येत्या १८ ऑगस्टला रिलीज होणार असून अभिषेक बच्चन, सयामी खेर अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका यात पाहायला मिळणार आहेत. क्रिकेटवर आधारित असलेला हा सिनेमा अनेक भावनांनी गुंफलेला आहे. घुमरच्या टीमने नुकतीच मेलबर्न मधील MCG स्टेडियम ला देखील भेट दिली असून ‘घुमर’ चर्चा आता सातासमुद्रापार पोहचल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube