पाकिस्तानींच्या ताटातील डाळी अन् कांदाही भारताचा; भारताकडून ‘या’ वस्तू खरेदी करतो पाकिस्तान..

Pakistan Dependent for these things on india : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात (Pahalgam Terror Attack) संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi0) अध्यक्षतेत काल झालेल्या सीसीएस बैठकीत पाकिस्तानचं कंबरडं मोडणारे पाच निर्णय घेण्यात आले. यात एक निर्णय अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचाही होता. या निर्णयानंतर वाघा बॉर्डर बंद झाली आहे. यामार्गे दोन्ही देशांतील नागरिक एकमेकांच्या देशात जाऊ शकणार नाहीत. तसेच जो काही व्यापार होता तो देखील बंद झाला आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की दोन्ही देश एकमेकांना बऱ्याच वस्तू विकतात तसेच काही बाबतीत दोन्ही देश एकमेकांवर अवलंबून आहेत.
भारतातून निर्यात करून आणलेल्या डाळी, मसाले आणि बासमती तांदूळ पाकिस्तानी (Jammu Kashmir Attack) लोक खातात. आता सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत भारत या वस्तू पाकिस्तानला (India Pakistan Conflict) देणार का असा सवाल आहे. पाकिस्तान भारताकडून नेमक्या कोणत्या वस्तू खरेदी करतो याची माहिती घेऊ या..
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या आधीच भारताने केली क्षेपणास्त्र चाचणी…
पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत
मार्च 2024 मध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले होते की पाकिस्तान भारताबरोबर पुन्हा व्यापार सुरू करण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. या दोन्ही देशांत दुबई आणि अन्य देशांच्या माध्यमातून व्यापार होत आहे. यात पैसे जास्त खर्च होत आहेत त्यामुळे थेट व्यापार सुरू करण्याची मागणी होत आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानची अर्थव्यवस्था दहापट लहान आहे. तसेच ग्रोथ रेटही सातत्याने कमी होत आहे.
2018-19 या वर्षाचा विचार केला तर भारताकडून एकूण 2066.56 कोटी रुपयांच्या विविध वस्तूंची निर्यात करण्यात आली होती. तर याच वर्षात भारताने पाकिस्तानकडून 494.87 कोटी रुपयांच्या वस्तू आयात केल्या होत्या. दोन्ही देशांत एकूण 2561.44 कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. 2017-18 मध्ये झालेल्या एकूण व्यापाराच्या तुलनेत (2412.83 कोटी) सहा टक्के जास्त होता.
भारताकडून ‘या’ वस्तू घेतो पाकिस्तान
भारत पाकिस्तान विविध खाद्य वस्तू निर्यात करतो. यात विविध प्रकारचे मसाले, तांदूळ आणि फळांचा समावेश आहे. मिरची, हळद आणि जिरे या वस्तू पाकिस्तानला पाठवल्या जातात.
बासमती तांदूळ लोकप्रिय आहेत. भारत जगभरात बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. बिर्याणी तयार करण्यासाठी या तांदळाचा वापर केला जातो. पाकिस्तानात बिर्याणी मोठ्या प्रमाणात तयार केली जाते.
भारतीय चहा जगात प्रसिद्ध आहे. विशेष करुन आसाम आणि दार्जिलिंग येथील चहा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.
आम्ही सरकारसोबत, सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सरकारला बिनशर्त पाठिंबा
फळांव्यतिरिक्त कांदा, लसूण, बटाटे या शेतमालाची निर्यात पाकिस्तानला होते. तसेच जास्त मागणीच्या काळात भाजीपाला देखील भारतातून पाकिस्तानला निर्यात केला जातो.
विविध प्रकारच्या डाळी, छोले, हरभरा या खाद्य वस्तू देखील पाकिस्तानला निर्यात होतात. म्हणजेच पाकिस्तानी लोकांच्या रोजच्या जेवणात भारताच्या डाळी असतात.