आम्ही सरकारसोबत, सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सरकारला बिनशर्त पाठिंबा

आम्ही सरकारसोबत, सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सरकारला बिनशर्त पाठिंबा

Rahul Gandhi On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक पावलावर सरकारसोबत आहे असं म्हटलं आहे. या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीत सर्वांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. विरोधी पक्षाने सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. असं राहुल गांधी म्हणाले.

तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील बैठकीत उपस्थित होते. सर्व पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. आम्ही म्हटले आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. तर आप नेते संजय सिंह म्हणाले की, सर्व पक्षांनी सरकारकडे दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली.

बैठकीत सुरक्षेतील त्रुटींवरही चर्चा

तर दुसरीकडे या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले की, दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्व पक्ष सरकारसोबत आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकारने सर्व पक्षांच्या नेत्यांना दहशतवादाविरुद्ध योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. पहलगाम हल्ल्याबाबत सर्व राजकीय पक्षांना सविस्तर माहिती देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

बैठकीला कोण उपस्थित होते?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे देखील बैठकीला उपस्थित होते.

आधी व्हिसा रद्द अन् आता पाकिस्तानवर ‘क्रिकेट स्ट्राईक’, भारतात PSL चे टेलिकास्ट बंद

त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, राजदचे प्रेमचंद गुप्ता आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीला गृहसचिव गोविंद मोहन आणि गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका हे देखील उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube