Uday Samant : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (Akhil Bhartiy Natya sammelamn) आज पुण्यात शुभारंभ झाला. या शुभारंभ सोहळ्यावेळी बोलतांना उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नाट्य परिषेदच्या निडणुकांवर जोरदार फटकेबाजी केली. आम्ही देखील किती मोठे कलाकार आहोत हे पंधरा महिन्यांपूर्वी तुम्ही पाहिलं, त्याच्यावर तर अख्खं नाटकं लिहिल्या जाऊ शकतं, असं गमतीशीर भाष्य त्यांनी केलं.
यावेळी बोलतांना सामंत म्हणाले, आम्ही कलावंत नसल्यानं आम्ही आम्हाला नाट्य संमेलनात सहभागी होत येणार नाही, अशी टीका सुरू होती. मात्र, आयोजकांनी आम्हाला निमंत्रित करून आमच्यावरचा हा आरोप दूर केला. खरंतर आम्ही देखील किती मोठे कलाकार आहोत, हे पंधरा महिन्यांपूर्वी तुम्ही पाहिलं, त्याच्यावर तर अख्ख नाटकं लिहिल्या जाऊ शकतं, असं सामंत म्हणाले. ते म्हणाले, पण ज्या पद्धतीने राजकारणात होत नाही, त्याही पेक्षा जास्त संघर्ष, नाट्यमय घडामोडी नाट्य परिषदेच्या निवडणुकांत होतात, नाट्य परिषदेच्या निवडणुकीतील कलावंत राहतात बाजूला आणि आम्हीच स्टेजवर असतो, अशा कानपिचक्याही सामंत दिल्या.
यावेळी सामंत यांनी शरद पवारांच्या कार्यशैलीविषयी भाष्य केलं. ते म्हणाले, नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून त्यांनी एकदा बैठक बोलावली. विश्वस्तांच्या निवडीसाठी सर्वानुमते तीन नावं मला सुचवा, असं सांगितलं. त्यावेळी नाट्य परिषदेची सातशे-आठशे लोकांची बॉडी होती. अचानक आमदराकीची निवडणूक लागली काय असं वातावरण होतं. पवारांनी गिरीश गांधी, अशोक हांडे, मोहन जोशी यांचं नावं जाहिर केली. पवारांनी एक चिठ्ठी मला देऊन नावं वाचायलं सांगितलं. त्यात माझं नावं होतं. पक्षांतर्गत कितीही मतभेद असेल तहीरी पवारांनी मला संधी दिली, असं सामंत म्हणाले.
सांस्कृतिक चळवळीला पक्षाचं गालबोट लागलता कामा नये.
सामंत म्हणाले, पक्षांतर्गत कितीही मतभेद असेल तरी सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असतांना सांस्कृतिक चळवळीला पक्षाचं गालबोट लागलता कामा नये. नाट्य परिषदेतील सगळी भांडणं थांबली पहिजे. कारण नाट्य परिषदेच्या अध्यक्षाला काही लाल दिव्याची गाडी नाही. कॅबिनेटचा दर्जाही नसतो. ना त्याच्याकडे पन्नास शंभर कोटीचा निधीही असतो. अखिल भारतीय नाट्य परिषदे ही नाट्य संस्थांची मातृसंस्था आहे. ही मातृसंस्था सर्व नाट्य संस्थांना सोबत घेऊन चालली तरच परिषदेच काम कानाकोपऱ्यात पोहोचेल, असं सामंत म्हणाले.
राजकीय व्यासपीठ अनेक निर्माण होत असतात. सांसकृतिक चळवळीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केंलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
यावेळी नाटककार प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, माजी संमेलनाध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, खासदार श्रीनिवास पाटील, नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, शशी प्रभू, अशोक हांडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अजित भुरे आदी उपस्थित होते.