Download App

बारामती अ‍ॅग्रोवर कारवाई ही दडपशाही, सुळेंच्या टीकेवर बावनकुळे म्हणाले, ‘तक्रारी आल्यावरच छापेमारी होतेय…’

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर (Baramati Agro Company) शुक्रवारी (५ जानेवारी) सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) छापा टाकला. बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीने ईडीने छापे टाकले. विशेष म्हणजे रोहित पवार हे परदेशात असताना ईडीने बारामती अ‍ॅग्रोवर छापे टाकले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, या छापेमारी संदर्भात आता रष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केलं.

रोहित पवारांवरील कारवाईला राजकारणाशी जोडू नका; फडणवीसांचा विरोधकांना सल्ला 

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडी आणि सीबीआयने टाकलेल्या धाडीतील 95 टक्के लोक विरोधी पक्षाचे आहेत. त्यामुळे या छाप्याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. छापेमारी करायची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही माझ्या बहिणी रजनी इंदुलकर, स्मिता पाटील आणि विजया पाटील यांचा राजकारणाशी लांबलांबचा संबंध नसतांना त्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. आता रोहित पवारांवर ईडी छापेमारी करत आहे. ही दडपशाही आणि सुडाचं राजकारण आहे, अशी टीका सुळें केली आहे.

तर आमदार जितेंद्र आवाड यांनी X वर एक पोस्ट करत लिहिले की, पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहिल्याचं हे फळ आहे. वाईट याचं वाटतं की, यात आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत. परंतु, मला विश्वसा आहे की, रोहित पवार या सर्व दबावतंत्राला बळी पडणारच नाही, तर उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडतील, असं आव्हाड म्हणाले.

तक्रारी आल्यावरच छापेमारी होत असते
तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली. ज्या काही तक्रारी असतात, त्यानुसार छापेमारी होत असते. कुणाचीही तक्रार आली की, त्यावर तपास होतो. महाविकास आघाडीच्या काळात आमच्याही चौकशा झाल्या. चौकश्या होत असल्यानं घाबरून जायचं नसतं, ज्यांच्यावर छापे पडले त्यांनी योग्य कागदपत्र दिली आणि मांडणी केली तर पुढे काही होत नाही, असं बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीतून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवार यांचे काम उल्लेखनीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

 

follow us