Download App

ज्युनियर डॉक्टरांना ‘रॅगिंग’ करणं पडलं महागात; थेट मंत्रालयातून आदेश, पुण्यात तीन विद्यार्थी निलंबित

पीडित विद्यार्थ्याने सुरुवातीला विभागप्रमुख डॉ. गिरीश बारटक्केृ आणि नंतर ससुनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे तक्रार केली.

  • Written By: Last Updated:

B.J. Medical College Ragging Case : पुण्यातील सरकारी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील तीन पदव्युत्तर विद्यार्थ्यांना, ज्युनियर डॉक्टरांना ‘रॅगिंग’ केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं आहे. (Ragging) इतकंच नाही तर त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं आहे. ससून रुग्णालयाशी संलग्न मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एकनाथ पवार म्हणाले की, ऑर्थोपेडिक्स विभागातील द्वितीय वर्षाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार मिळाल्यानंतर कॉलेजने ही कारवाई केली आहे.

ससून रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधील ऑर्थोपेडिक्स विभागात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या एका निवासी डॉक्टरने दोन वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंगची तक्रार केली होती. या तक्रारीत त्याने आपल्याला अनेक दिवसांपासून वरिष्ठ डॉक्टरांकडून हा त्रास सुरू होता असं म्हटलं. सिनिअर डॉक्टर पीडित विद्यार्थ्याला त्याच्या डोक्यावरुन कधी थंड तर कधी गरम पाणी ओतून घेण्यास भाग पाडत होतं.

पीडित विद्यार्थ्याने सुरुवातीला विभागप्रमुख डॉ. गिरीश बारटक्केृ आणि नंतर ससुनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्याच्या तक्रारीची आवश्यक ती दखल घेतली न गेल्याने अखेरीस, कुटुंबीयांनी मुंबईतील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे याबाबत दाद मागितली.

पीबीजी पुणे जॅग्वार्सला मिळाली मोठी ताकद, इजिप्तच्या दिना मेशरेफचा संघात समावेश

पीडित डॉक्टर विद्यार्थ्याच्या पालकांनी प्रथम मुंबईतील मंत्रालयाशी संपर्क साधला. मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर कॉलेज प्रशासनाने तातडीने रॅगिंग विरोधी कमिटीची बैठक बोलावली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरू होती, ज्यात तक्रारदार आणि ज्यांच्यावर आरोप आहेत, त्या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. या चौकशीनंतर समितीने अहवाल सादर केला.

आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि तपासाच्या आधारे, तीन पदव्युत्तर विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याचे आणि त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आल्याचंही डीन डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितलं. स्थापन करण्यात आलेल्या अँटी रॅगिंग कमिटीमध्ये १५ ते २० जणांचा समावेश आहे. अँटी रॅगिंग कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत. पीडित डॉक्टर विद्यार्थ्यांनी ८-१० दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. एका विद्यार्थ्याच्या आईने ही तक्रार केली आहे.

follow us

संबंधित बातम्या