Pune Crime: तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू झाला होता तरी औपचारिकता म्हणून रुग्णालयामध्ये दाखल केले होते.
अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा, यासाठी किशोर आवारे हे सोमटाने टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून ते लढा देत होते, ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आवारे हे नगर परिषदेमध्ये कामानिमित्त आले होते. त्यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन ते खाली उतरत असताना दबा धरून असलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. आवरे यांच्यावर गोळीबारासह कोयत्याने वार करण्यात आले आहे. हल्ला झाल्यानंतर ते त्याच ठिकाणी काही वेळ पडून होते. त्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Sanjay Raut : त्यांनी वकिली केली, पण कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळायला हवी, राऊतांचा फडणवीसांना टोला
काय आहे नेमकं प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या ४ जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला आहे. त्यापैकी दोघाजणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.