Sanjay Raut : त्यांनी वकिली केली, पण कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळायला हवी, राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut : त्यांनी वकिली केली, पण कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळायला हवी, राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut On Devendra Fadanvis : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान हा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिल्या ते म्हणाले, आजचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला आहे. आजचा निकालमधील काही महत्वाच्या मुद्दयांवर मी आपलं लक्ष वेधतो. सरकार कोसळेल असे वक्तव्य करणाऱ्या महाविकास आघाडीच्या मनसुम्ब्यांवर पाणी फिरलं. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट सांगितलं. तसेच आमदारांच्या अपात्रतेचाअधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे.

Sanajay Raut : मोदींप्रमाणे लोक फडणवीसांच्या डिग्रीवरही संशय घेतील, सामनातून टीकास्त्र

मात्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर आणि न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ लावण्यावरून आजच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातून फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांच्या कायद्याच्या पदवीवर ताशेरे ओढले आहेत. राऊत म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांनी नागपूरच्या कोर्टात वकिली केली असं ते सांगतात. पण त्यांनी आता पुन्हा एकदा कायद्याची पुस्तकं चाळायला हवीत. कारण कधीकधी रिव्हीजन करण्याची वेळ येते. तसेच या देशीतील कायदा फक्त वकिलांना कळतो असं नाही. सामान्यांनाही तो चांगला कळतो.’ अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे.

Udhav Thackeray : ठाकरे अध्यक्षांना पत्र लिहिणार, चुकीचा निर्णय दिला तर कोर्टात जाणार

दरम्यान सामनामध्ये म्हटले आहे की, ‘फडणवीस हे वकील आहेत. ते न्यायालयाच्या निकालातून अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकीय सोयीचा अर्थ काढत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या डिग्रीप्रमाणे फडणवीस यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक उद्या संशय घ्यायला लागतील.’ अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube