Udhav Thackeray : ठाकरे अध्यक्षांना पत्र लिहिणार, चुकीचा निर्णय दिला तर कोर्टात जाणार
Udhav Thackeray Maharashtra Political Crises : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी ते येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून सर्वत्र स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र पाहायला मिळत आहे. या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सरकारला धोका नाही पण लढाई संपलेली नाही; Ujjwal Nikam यांचे विश्लेषण
या दौऱ्यावर जाण्या आधी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला ते म्हणाले राज्यात सध्या बेबंदशाही सुरू आहे. दरम्यान आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे जाणार आहे. त्यामुले आता ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे.
संजय राऊत ‘मेरा नाम जोकर’मधला जोकर, नारायण राणेंनी डिवचलं…
यामध्ये ते विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंताी करणार आहेत. तर विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिल्यास आम्ही त्या विरोधीत कोर्टात जाऊ असा इशारा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांची निवड देखील चुकीची असल्याचं त्यांनी यावेळी म्हटले आहे.