BCCI चा मोठा निर्णय! सचिनप्रमाणेच धोनीचा सन्मान; सात नंबरची जर्सी निवृत्त

MS Dhoni Seven Number Jersey Retired : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) निवृत्तीनंतर ज्या पद्धतीने सन्मान केला. त्याच पद्धतीने आता कॅप्टन कुल म्हणून परिचित असणाऱ्या महेंद्र सिंगचाही सन्मान BCCI कडून केला जाणार आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर त्याची 10 नंबरची जर्सी निवृत्त करत ती कोणताही खेळाडू परिधान करू शकणार नाही असा निर्णय घेतला […]

Letsupp Image   2023 12 15T115721.866

Letsupp Image 2023 12 15T115721.866

MS Dhoni Seven Number Jersey Retired : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) निवृत्तीनंतर ज्या पद्धतीने सन्मान केला. त्याच पद्धतीने आता कॅप्टन कुल म्हणून परिचित असणाऱ्या महेंद्र सिंगचाही सन्मान BCCI कडून केला जाणार आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर त्याची 10 नंबरची जर्सी निवृत्त करत ती कोणताही खेळाडू परिधान करू शकणार नाही असा निर्णय घेतला होता. याच प्रकारे आता बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) 7 नंबरची जर्सी देखील निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता कोणत्याही भारतीय खेळाडूला धोनीची सात नंबरची जर्सी परिधान करू शकणार नाहीये.

BJP : CM पद गेले अन् राजकारणही फिरले; खुर्ची गेलेल्या 11 पैकी 8 नेत्यांची नवी इनिंग!

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना आणि विशेषत: संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना तेंडुलकर आणि धोनीशी संबंधित जर्सी क्रमांक निवडण्याचा पर्याय दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सध्याच्या भारतीय संघातील युवा खेळाडू आणि खेळाडूंना एमएस धोनीची 7 क्रमांकाची जर्सी न निवडण्यास सांगण्यात आले असून, धोनीच्या खेळातील योगदानाबद्दल त्याची सात नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी बीसीसीआयने सचिनची 10 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता.

Mohammed Shami च्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस; बॅडमिंटनच्या दोन खेळाडूंना खेलरत्न

धोनीच्या नावावर आहेत अनेक विक्रम

धोनीच्या नावावर अनेक विक्रम असून, यात कसोटीत धोनीने 38..09 च्या सरासरीने 4876 धावा आहेत यात सहा शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय सामन्यात धोनीने 50.58 सरासरीने 10 शतके आणि 73 अर्धशतकी खेळी करत 10,773 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, T20 मध्ये 126.13 च्या स्ट्राइक रेट आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने धोनीच्या नावावर 1617 धावांची नोंद आहे. 42 वर्षीय धोनी 2024 मध्ये आयपीएलमध्ये  2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Exit mobile version