Womens World Cup ICC Demerit Sidra Amin Point : पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगली बातमी येण्याचे कोणतेही चिन्ह नाही. पुरुष आशिया कपमध्ये अंतिम सामन्यासह तिन्ही सामन्यांमध्ये भारताकडून वाईट पराभव पत्करल्यानंतर, आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्येही पाकिस्तानी संघाची अवस्था वाईट आहे. पाकिस्तानी महिला संघाला या स्पर्धेत दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामध्ये दुसरा पराभव टीम इंडियाविरुद्ध झाला. पण एवढेच नाही, या पराभवानंतर आयसीसीने पाकिस्तानी संघाची स्टार फलंदाज सिदरा अमीनलाही शिक्षा दिली आहे. सामन्यादरम्यान केलेल्या लज्जास्पद कृत्याबद्दल सिदराला ही शिक्षा मिळाली आहे.
भारत आणि पाकिस्तान (Ind VS Pak) यांच्यातील महिला विश्वचषक सामना (Womens World Cup) रविवार, 5 ऑक्टोबर रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. भारताने पाकिस्तानसमोर (Pakistan) 248 धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तान पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि फक्त 159 धावांवर गारद झाला. अनुभवी फलंदाज सिदरा अमीनने एकटीने किल्ला सांभाळला. 81 धावांची दमदार खेळी करत (ICC) काही आशा जिवंत ठेवल्या.
भर मैदानात केलं लज्जास्पद कृत्य
पण सिदराचा डावही 40 व्या षटकात संपला, जेव्हा तिला भारतीय फिरकी गोलंदाज स्नेह राणाने बाद केले. सिदरा तिच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. तिचे शतकही हुकले. कदाचित या दोन्ही कारणांमुळे निराशा इतकी जबरदस्त होती की पाकिस्तानी फलंदाजाने पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी एक लज्जास्पद कृत्य केले. बाद झाल्यानंतर, सिद्रा अमीनने रागाने तिची बॅट जमिनीवर आपटली. ही कृती आयसीसीला आवडली नाही. मॅच रेफरीने 33 वर्षीय फलंदाजाला शिक्षा केली.
आयसीसीने कोणती शिक्षा सुनावली?
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी, आयसीसीने एका प्रेस रिलीजमध्ये जाहीर केले की सिदरा अमीनने आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केले आहे. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे किंवा मैदानावरील इतर उपकरणे आणि साहित्यांशी गैरवर्तनाशी संबंधित आहे. रागाच्या भरात बॅटने गैरवर्तन करणे हा लेव्हल 1 चा गुन्हा होता. मॅच रेफरीने सिदरा अमीनच्या कृतीला लेव्हल 1 चा गुन्हा घोषित केले आणि तिला फटकारले. लेव्हल 1 च्या गुन्ह्यामुळे तिची मॅच फी कापली गेली नसली तरी, सिदराला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला.