प्रविण सुरवसे,प्रतिनिधी.
Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या देशात क्रिकेटचे महायुद्ध रंगले आहे म्हणजेच क्रिकेट वर्ल्डकप सुरु आहे. यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पूर्णाकृती पुतळा हा लवकरच मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर बसविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे सचिनचा हा पुतळा अहमदनगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवला आहे. तब्बल 14 फूट उंच असलेला सचिनचा पुतळा हा अत्यंत आकर्षक पद्धतीने बनवण्यात आला आहे.
सचिनची ऍक्शन ते पुतळ्याची स्टाईल…
सचिनचा पुतळा साकारणारे नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पुतळा साकारताना नेमक्या काय अडचणी आल्या? याविषयी सांगितलं. कांबळे म्हणाले, पुतळ्याचे काम करताना अनेक बारीक गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या कामामध्ये मला सचिन यांचे मोठे बंधू अजित तेंडुलकर यांची खूप मदत झाली. पुतळ्याचे काम करत असताना सचिनच्या बुटाच्या आकारापासून ते बॅटची ऍक्शन कशी असावी व कुठल्या दिशेला असावी यावर चर्चा झाली.
…तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको, सीएम शिंदेंविरोधात त्यांचाच पदाधिकारी आक्रमक
अखेर सिक्स मारत असतानाची एक ऍक्शन फायनल झाली. त्यांनतर पुतळ्याचे काम सुरु झाले. पुतळा साकारत असताना सचिनची नजर व त्यांच्या हेल्मेटवरील लोगो या सर्व बारकाव्यांवर विशेष मेहनत घेण्यात आली. हा पुतळा आपल्या अहमदनगर येथील कार्यशाळेत बनवण्यात आला आहे. यासाठी जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लागला. सचिन यांची वेळ घेऊन या कामासाठी त्यांना भेटलो. याकरिता त्यांच्या काही चित्रांचे साहाय्यही घेतले असे कांबळे म्हणाले.
Pollution मुळे हवेतील ऑक्सिजन घटतोय, ही लक्षण दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला
जाणून घ्या सचिनच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये
सचिनची मुख्य मूर्तीची उंची 10 फूट असून त्याच्या हातात जी बॅट साकारण्यात आली आहे तिची उंची 04 फूट अशी पुतळ्याची एकूण उंची 14 फुटांची आहे. पुतळ्याच्या खाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारण्यात आला आहे. म्हणजेच हा पुतळा बॉलवर स्थित आहे. त्या चेंडूच्या पॅनलवर सचिनचे विक्रम हे नमूद केलेले आहेत. त्यामध्ये त्याच्या एकदिवसीय, कसोटी आणि मुंबईकडून खेळतानाची कामगिरी नमूद केलेली आहे. त्यात इतरही विक्रमांचा समावेश आहे. दरम्यान सचिनचा पुतळा हा कांस्याचा बनवण्यात आला असून पुतळ्याखालील चेंडूही कांस्याचा बनवण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या सचिन तेंडुलकरच्या पुतळय़ाचे अनावरण विश्वचषकाच्या भारत-श्रीलंका सामन्यापूर्वी 1 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.