…तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको, सीएम शिंदेंविरोधात त्यांचाच पदाधिकारी आक्रमक

  • Written By: Published:
…तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको, सीएम शिंदेंविरोधात त्यांचाच पदाधिकारी आक्रमक

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला. अनेक गावांत राजकीय नेत्यांना बंदी करण्यात आली. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. कल्याणमध्येही मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरेही (Arvind More) सहभागी झालेत. यावेळी त्यांनी मराठा मुख्यमंत्री असतांना नोटीसा धाडल्या जात असतील तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको, असं विधान केलं.

Pollution मुळे हवेतील ऑक्सिजन घटतोय, ही लक्षण दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला 

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आर-पारची लढाई सुरू केली. जरांगेंनी उपोषण सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी मराठा समाजाने उपोषणाचे हत्यार उपसले. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या निषेधार्थ मराठा समाजाने शुक्रवारपासून कल्याण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं. यावेळी मोरे यांनी मराठा आरक्षणावरून सीएम शिदेंना इशारा दिला. ते म्हणाले की, सरकारचे प्रतिनिधी पोलीस असून त्यांनी आंदोलन न छेडण्याबाबत नोटीसा बजावल्या. पोलीसही आरक्षणाच्या बाजूने नाहीत, ते सरकारच्या बाजूने असल्यानं त्यांनी नोटीस बजावण्याचे धाडस केले. मराठा मुख्यमंत्री असताना मराठ्यांना नोटीस देत असतील आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर मराठा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे, असं मोरे म्हणाले.

ते म्हणाले, सरकार आमचे असले तरी सरकारही आरक्षणाच्या बाजूने असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर न केल्यास कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

पोलिसांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना नोटिसा बजावल्या असून, उपोषणाला परवानगी नाकारली आहे. तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन द्यावे, उपोषण करू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटलं. यावर आमचे उपोषण शांततेत सुरू असताना ही दडपशाही का, असा सवाल मोरे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube