एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुढचा प्लॅन सांगितला

एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुढचा प्लॅन सांगितला

Maratha reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना निरोप सांगण्यासाठी माजी मंत्री अर्जून खोतकर आणि माजी मंत्री राजेश टोपे गेले होते. सरकारच्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांचा प्लॅन का आहे ते स्पष्ट केले.

ते म्हणाले की उद्या 123 गावातील प्रतिनिधीसोबत बैठक होणार आहे. सर्व समन्वयक लोकांशी चर्चा करणार आहे. आम्हाला सरकारचा निरोप आला आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार आहेत. ज्याकडे वंशावळी आहेत, त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्रे दिली जातील असे सांगण्यात आले आहे.

गुलाबराव पाटलांना ‘जुलाबराव’ म्हणताच चिडले; मराठा आंदोलकाला केली शिवीगाळ?

मनोज जरांगे पुढं म्हणाले की सरकारच्या घोषणेनंतर आनंदी झाला असे म्हणता येत नाही. कारण वंशावळीचे पुरावे आमच्याकडे आहेत तर तुमच्या अध्यादेशाची गरज काय आहे? आम्ही प्रांत ऑफीसमध्ये जाऊन घेऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

‘रोजगार पळवतायं अन् म्हणतायं शासन आपल्या दारी’; विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका

सरकारने काढलेला जीआर नेमका काय आहे? हे समजणे महत्वाचे आहे. जीआर काढलाय या आनंदात राहून चालणार नाही. वंशावळी ज्याकडे आहेत त्यांनाच दाखला दिला जाणार असेल तर सरकारच्या अध्यादेशाची गरज नाही. वंशावळीचे पुरावे द्या अन् तुम्हाला कुणबीचे प्रमाणपत्रे देतो असे असेल तर आम्ही त्यांचा जीआर घेणारच नाही. एसडीएमकडे जाऊन आम्ही दाखले घेऊ. सरकारच्या जीआरचा आम्हाला उपयोग नाही. वंशावळीचे पुरावे नाहीत म्हणून आम्ही सरसकट कुणबीचे दाखले द्या अशी मागणी केली आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube