Pollution मुळे हवेतील ऑक्सिजन घटतोय, ही लक्षण दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला

Pollution मुळे हवेतील ऑक्सिजन घटतोय, ही लक्षण दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला

Pollution : सध्या देशभरात थंडीचा चाहूल लागली आहे. मात्र त्याबरोबर प्रदुषणाचा (Pollution) त्रास देखील सुरू झाला आहे. त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे ही शहरं प्रदुषित हवेसाठी सर्वोच्च स्थानावर आहेत. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यात अस्थमा, श्वसनाचे आजार सर्दी खोकला आणि अॅलर्जी यांसारख्या आजारांनी डोकेवर काढले आहे.

Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित पाटील प्रकरणाचा तपास; दानवेंनी स्पष्टच सांगितलं

शरीरावर प्रदुषणाचा कसा परिणाम होतो?

सध्या राज्यात प्रदुषित विषारी हवेचं प्रमाण वााढलं आहे. त्यामुळे एक्यूआय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स देखील वाढला आहे. ही पातळी वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यूएस एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, एक समान्य व्यक्ती दिवसभरातून किमान 22 हजारवेळा श्वास घेते. मात्र ही प्रदुषित हवा असल्याने हवेतील घाणीचे कण फुफ्फुसांमध्ये गेल्याने श्वसनाचे तसेच ह्रदयाचे देखील आजार होऊ शकतात.

गृहमंत्री आता तरी कारवाई करतील का? ललित पाटील प्रकरणात अंधारेंचा मोठा पुरावा…

ही लक्षण दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला…

दरम्यान प्रदुषित विषारी हवेचं प्रमाण वााढलं आहे. त्यामुळे हवेतील ऑक्सिजन घटत आहे. त्यामुळे शरिरावर अनेक परिणाम होत आहे. त्यामुळे अशी काही लक्षण दिसल्याचं तात्कळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून आजार वाढणार नाही. तात्कळ निदान झाल्याने उपचार वेळेवर होतील आणि आजार लवकर बरा होण्यास मदत होणार आहे. तसेच आजाराचा संसर्ग देखील टळू शकतो.

ललित पाटील प्रकरणात माजी महापौर विनायक पांडेची होणार चौकशी, गुन्हे शाखेने पाठवली नोटीस

कोणती आहेत ही लक्षणं?

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोक्सिमिया होतो. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. डोकेदुखी सुरू होते. श्वासोच्छवासाची समस्या जाणवते. हृदयात धडधड सुरु होते. त्वचेचा रंग बदलतो, विशेषतः नखे आणि ओठ यांचा यामध्ये समावेश आहे. खूप खोकला होतो. शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूवर देखील परिणाम होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube