गृहमंत्री आता तरी कारवाई करतील का? ललित पाटील प्रकरणात अंधारेंचा मोठा पुरावा…

गृहमंत्री आता तरी कारवाई करतील का? ललित पाटील प्रकरणात अंधारेंचा मोठा पुरावा…

Sushma Andhare On Lalit Patil Case : गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करांचं प्रकरण चांगलचं चर्चेत आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्कर ललित पाटील(Lalit Patil Case) याने उपचार सुरु असतानाच धूम ठोकल्याचं समोर आलं होतं. त्यावरुन राज्यभरात वादंग पेटलं होतं. या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी आता आणखी एक पुरावा दिला आहे. सुषमा अंधारे यांनी ससूनमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या कैदी रुग्णांची यादीच जाहीर केली आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

Babanrao Dhakne : संघर्षशील नेता हरपला! माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

सुषमा अंधारे यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये ललित पाटील हे नावं स्पष्टपणे लिहिल्याचं दिसून येत आहे. ललित पाटीलवर उपचार करणारे डॉक्टर संजीव श्याम ठाकूर असं लिहिलंय. एका गुन्हेगाराला अशा पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न जर दस्तूर खुद्द ससूनचे डीन करीत असतील तर हे गंभीर असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

jammu kashmir मध्ये भारतील लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाच दहशतवाद्यांचा खात्मा

तसेच या संपूर्ण पुराव्यावरुन सन्माननीय गृहमंत्री ससून सेटिंग संजीव शामराव ठाकूर यांना सहआरोपी करत ताब्यात घेऊन चौकशी करणार काय? ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणारा रोजरी स्कूलशी संबंधित आरोपी विनय अरहनासुद्धा याच वार्डात उपचार घेत होता. याचीही नोंद आढळून येत असल्याचंही अंधारे म्हणाल्या आहेत.

Maratha Reservation: ‘सदावर्तेंना संपवायला हवं होतं; CM शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान

विनय अरहणाचा ड्रायव्हर दत्ता डोकेला हडपसरमधून पोलिसांनी ताब्यात घेऊन पंधरा दिवस उलटले मात्र, अजूनही तपास ससून रुग्णालयापर्यंत का पोहोचत नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. ससूनचे अगोदरचे अधिष्ठाता काळे आणि आताचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांचं निलंबन करून त्यांची सहआरोपी म्हणून चौकशी झाली पाहिजे.

Sanjay Raut : ‘काही दिवसांनी डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

कारण ते पदावर असताना तपासावर प्रभाव टाकू शकतात. गेल्या 9 महिन्यात ते ललित अनिल पाटील याला काय ट्रीटमेंट देत होते. त्याच्या कोण-कोणत्या तपासण्या, शस्त्रकिया, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ही सगळी माहिती संजीव ठाकूर यांनी दिली पाहिजे. अशी मागणी अंधारे यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी दादा भुसेंवर देखील या प्रकरणी पुन्हा एकदा आरोप केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube