Babanrao Dhakne : संघर्षशील नेता हरपला! माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

Babanrao Dhakne : संघर्षशील नेता हरपला! माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

Babanrao Dhakne : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakne) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, निमोनिया या आजारामुळे ढाकणे गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस.एस.दीपक यांनी माध्यमांना दिली आहे.

Horoscope Today : आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

एक संघर्षशील नेतृत्व :
बबनराव ढाकणे हे राजकारणातलं एक मोठे नाव असून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आजवर जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांमध्ये उत्कृष्ट कामे केले आहे.

आमदार ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास : 
विधानसभेच्या निवडणुका १९७८ मध्ये झाल्या. या निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ३७ हजार १३४ मते प्राप्त होऊन विजयी झाले. या निवडणुकीतील विजयामुळे स्व. बबनराव ढाकणे पहिल्यांदाच आमदार म्हणून राज्याच्या विधिमंडळात पोहोचले. २ ऑगस्ट १९७८ रोजी पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. २१ डिसेंबर १९७९ रोजी पुलोद मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिले. ७ मार्च १९७९ रोजी महाराष्ट्र जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवडणुकीद्वारे बहुमताने निवड त्यांची निवड करण्यात आली.

Maratha Aarakshan : मराठा आणि कुणबी यांच्यात काय फरक आहे? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi

लोकसभा निवडणुकीत पराभव :
जून १९८० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून जनता पक्षाचा उमेदवार म्हणुन विजयी दुसऱ्यांदा आमदार म्हणून बबनराव ढाकणे निवडून आले. १ जुलै १९८० रोजी महाराष्ट्र विधिमंडळ जनता पक्षाचे गटनेते म्हणून निवड त्यांची निवड झाली. १७ डिसेंबर १९८१ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. डिसेंबर १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर-दक्षिण मतदार संघातून मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Disqualification Mla : शिंदे गटाचा मोठा डाव; विधानसभा अध्यक्षांकडे केली ‘ही’ मागणी

1985 मध्ये साधली आमदारकीची हॅट्रिक :
६ मार्च १९८५ रोजी महाराष्ट्र विधानसभेवर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी. २७ नोव्हेंबर १९८७ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमधून पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती (सिनेटवर) निवडणूकीमधून निवड. ३० जुलै १९८८ रोजी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणून निवड. २७ नोव्हेंबर १९८९ रोजी राम मंदिर आणि बोफोर्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या झालेल्या नवव्या सार्वत्रिक निवडणुकीत बीड जिल्हा लोकसभा मतदार संघातून जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना विजय मिळाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube