दादा भुसे पुन्हा सुषमा अंधारेंच्या रडारवर, आता थेट मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी

  • Written By: Published:
दादा भुसे पुन्हा सुषमा अंधारेंच्या रडारवर, आता थेट मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी

पुणेः ससूनमधील हॉस्पिटलमधील (Sasoon Hospital Drug Racket) ड्रग्ज विक्री व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना पुन्हा घेरले आहे. दादा भुसे व ललित पाटील यांचा संबंध असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी यांनी केला होता. आता सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

उदयनराजे भोसले राजकारणातून निवृत्त होणार? खुद्द राजेंनीच दिले संकेत, ‘निवडणूक लढण्याची खाज…’

सुषमा अंधारे म्हणाल्या, अनिक्षा जयसिंघानी प्रकरणी आळीपिळी गुपचिळी केली. एकमेंकांच्या मदतीने प्रकरण मिटवले आहे. प्रदीप कुरुंदकर प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण चौकशी समितीली देतो सांगून प्रकरण दृष्टीआड केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपकंत्राटावरून बैठक घेतात. परंतु इतर मोठ्या विषयाकडे लक्ष घालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर बोलावे. निदान पालकमंत्री अजित पवारांनी यावर लक्ष घातले पाहिजे. ललित पाटीलला मदत करणाऱ्या दत्ता डोके, ससूनचे डीन संजय ठाकरू, उपचार करणारे डॉक्टर लोकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना ‘चॅलेंज’

ललित पाटील याचा फोन पोलिसांचा ताब्यात आहेत. तरी फोन उघडला जात नाही. यामध्ये एकतर डीन संजय ठाकूरांचे निलंबन केले पाहिजे. त्यांना व पोलिसांना सह आरोपी करावे. त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. काही मंत्री आणि आमदार यांचा सहभाग आहे का याची चौकशी गृहमंत्री फडणवीस यांनी करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकानं समज द्यावी; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांकडे रोख!

एक घर घेण्यासाठी अनेक कागदपत्रे लागतात. नाशिकमध्ये दोनशे-तीनशे कोटींचा कारखाना उभा राहतो. पोलिस प्रशासनाने मदत केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. याला पालकमंत्री जबाबदार आहे. मंत्रिपद एखादी व्यक्ती असताना चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही. चौकशीत प्रभाव पडतो. दादा भुसे यांना मंत्रिपदावरून बाजूला करावे. भाजपचा आमदार व संघटकात्मक पदाधिकारी यांचा यात सहभाग आहे. सरकार पक्षातील पदाधिकाऱ्यांचे संबंध आहे. या लोकांनी दुबईत पार्ट्या केल्या आहेत, याची चौकशी करण्याची मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube