440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना ‘चॅलेंज’

  • Written By: Published:
440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना ‘चॅलेंज’

पुणे : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. देशात भाजपने (BJP) महाविजय 2024 अभियान सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या दौरावर आहेत. या मतदारसंघातील दौंड येथे या अभियानातंर्गत एक कार्यक्रम झाला. त्यावेळी बावनकुळे यांनी यंदा 440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती लोकसभा शंभर टक्के जिंकणार आहे. 51 टक्के मते घेऊन जिंकू, असा दावा केला आहे.

गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकानं समज द्यावी; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांकडे रोख!

बावनकुळे म्हणाले, राज्यात महाविजयाचा संकल्प केला आहे. 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. मावळ, शिरूर, बारामतीसह राज्यात महायुतीचे उमेदवार कोण असतील, याची आम्हाला चिंता नाही. जेथे महायुतीतील जो पक्ष मजबूत असेल, तेथे त्यांचा उमेदवार असेल. त्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपची केंद्रीय समिती घेईल.


शिंदे-गटाला दिलासा! ठाकरे गटाची याचिका कोर्टाने फेटाळली, कोर्ट म्हणाले, ‘ठोस पुरावेच नाहीत…’

महायुतीमध्ये बारामती लोकसभेतून आम्ही नक्की विजयी होऊ. या महाविजयाचा संकल्प करण्याकरिता आजची बैठक होती. या बैठकीमध्ये सहाशे कमांडर कार्यकर्ते हे बारामती लोकसभेसाठी नियुक्त केले आहे. हे कार्यकर्ते साडेतीन लाख घरी जाऊन सरकारच्या योजनांची माहिती देणार आहे. संपर्क ते समर्थन अभियान राबविणार आहे. 51 टक्के मते घेऊन बारामती लोकसभा आम्ही जिंकणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या मतदारसंघातून भाजपच्या कांचन कुल या पुन्हा उमेदवार असणार का ? याबाबत मात्र बावनकुळे हे स्पष्ट बोलले नाहीत. याबाबत राज्यातील तिन्ही नेते व केंद्रीय समिती निर्णय घेईल, असे बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मुक्काम तुरुंगातच! अजितदादांनी कुटुंबियांना भेट नाकारली

440 व्होल्टेजचा कंरट बारामतीकरांना द्यायचा आहे आणि लोकसभा जिंकायचे आहे. दौंडला मतदान मशीन आले की एवढ्या जोराने बटन दाबा की चारशे व्होल्टेजचा करंट द्यायचा आहे. यंदा 440 करंट लागणार आहे. बावनकुळे यांनी सभेला उपस्थित असलेल्या काही जणांना कुणाला करंट द्यायचा याबाबत विचारला. त्यावेळी काही जणांना सुप्रिया सुळे, बारामतीकरांना करंट बसेल, असे म्हटले आहे. त्यावर बावनकुळे एकदम ओके असे म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube