राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मुक्काम तुरुंगातच! अजितदादांनी कुटुंबियांना भेट नाकारली

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मुक्काम तुरुंगातच! अजितदादांनी कुटुंबियांना भेट नाकारली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. भोसले यांच्या पत्नी, माजी नगरसेविका रेश्मा भोसले आणि त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) पुण्यात भेट नाकारली. यामुळे तुरुंगातून ससूनला पुन्हा उपचारासाठी हलविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Former NCP MLA Anil Bhosle’s wife, former corporator Reshma Bhosle and their son were denied a visit by Deputy Chief Minister Ajit Pawar)

माजी आमदार अनिल भोसले 2019 पासून बँक घोटाळ्यात येरवडा कारागृहात आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून ते आजारपणाचे कारण देत ससून रुग्णालयात उपचार घेत होते. पण ड्रग्ज तस्कर ललित पाटील रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात पाठविण्यात आले. यातच भोसले यांचाही नंबर होता.

निव्वळ पोरखेळ सुरु! विधानसभा अध्यक्षांना झापले; 10 मुद्द्यांत समजून घ्या कोर्टात नेमके काय घडले?

यानंतर आज पालकमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी रेश्मा भोसले त्यांच्या भेटीसाठी पुण्यातील सर्किट हाऊसला आल्या होत्या. पण पवार यांनी त्यांना भेट नाकारली, त्यामुळे याच कारणासाठीच रेश्मा भोसले अजित पवार यांच्या भेटीला आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2017 पासूनच भोसले अन् पवार यांच्यात वितुष्ट :

2016 मध्ये पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून अनिल भोसले विजयी झाले होते. मात्र 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर रेश्मा भोसले भाजपमधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. तेव्हापासूनच अजित पवार आणि भोसले कुटुंबात वितुष्ट आले. पुढे 2019 मध्ये अनिल भोसले यांना बँक घोटाळ्यात अटक करण्यात आली होती.

कंत्राटी भरतीविरोधात शरद पवार आक्रमक, मुली बेपत्ता होण्यावरुनही सरकारला सुनावले

अजितदादा अॅक्शन मोडमध्ये :

गत आठवड्यात शिंदे सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले. यात चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुण्यात आले होते. यात त्यांनी दिवसभर बैठका घेतल्या. यात त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचाही आढावा घेतला. काही दिवसांपूर्वीच ससूनच्या प्रवेशद्वारात अमली पदार्थ सापडले होते. शिवाय अमली पदार्थ विक्रीतील प्रमुख आरोपी ललित पाटील फरार झाला होता. या पार्श्वभूमीवर ससूनचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube