गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकानं समज द्यावी; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांकडे रोख!
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचा दौरा केला. ठिकठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभांच्या माध्यमातून त्यांनी रक्षणाबाबत जनजागृती केली. दरम्यान, जरांगे पाटील हे उद्या अंतरवली सराटीमध्ये आरक्षणासाठी विराट सभा घेणार आहेत. यावरून जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केली. यावरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
World Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध गिल करणार पुनरागमन? कर्णधार रोहित शर्माने दिली गुड न्यूज
उद्याची सभा ही हिंसक होईल, असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनी छत्रपती संभाजीनंगर पोलिसांना याबाबत पत्रही लिहिलं.
मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गुणरत्न सदावर्ते यानी केलेल्या मागणीविषयी विचारले असता ते म्हणाले की, एक मराठा, लाख मराठा घोषणा द्यायची आणि मराठ्यांनाच विरोध करायचा, हे काही नेत्यांचं धोरण आहे. ते कोण आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. गोरगरिबांचं आरक्षण रद्द करून त्यांच्या ताटात कसं विष कालवायचं हे त्यांना ठाऊक आहेत. जे मराठाद्वेषी आहेत, त्याच नेत्याचे सदावर्ते चेले आहेत, असं सदावर्ते म्हणाले.
ते म्हणाले, आम्ही मागणी आमच्या हक्काची मागणी करतो. कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही सन्मानच करतो. आम्ही वेगळं आरक्षण मागतचं नाही. आम्ही मुळात कुणबीच आहोत. आम्ही कुणबीतूनच आरक्षण मागतो. खरंतर सदावर्तेंनी सरकारला जाब विचारायला पाहिजे की, इतक्या संवैधानिक मार्गाने उपोषण करणाऱ्या निष्पाप लोकांवर का लाठीचार्च केला? मात्र, ते जनतेची बाजू न घेता, सरकारची बाजू घेत आहेत. फडणवीस हे सदावर्तेंचे मालक आहेत. त्यांच्या मालकाने सदावर्तेंना समज द्यावी. तुम्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहात. तुमचं नाव खराब होईल. तुम्हाला विनंती आहे, लोक अंगावर घालून कायदा आणि सुव्यवस्था मोडू नका, राज्यात अशांतता पसरवू नका, असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.
गेल्या काही महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी अंतरवली सराटी गावात मोठं उपोषणही केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतवलीत जाऊन त्यांची भेट घेतली होती. मराठी आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला चाळीस दिवसांची मुदत मागितली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन जरांगेंनी उपोषण मागे घेतलं होतं. मात्र, अद्यापही मराठा आरक्षणासंदर्भात काहीच निर्णय झाली नाही. त्यामुळं उद्या होणाऱ्या सभेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे.