World Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध गिल करणार पुनरागमन? कर्णधार रोहित शर्माने दिली गुड न्यूज
IND vs PAK: क्रिकेट वर्ल्ड कपच्या (World Cup) युद्धात उद्या पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) भारत (India) मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड कपमध्ये कायमच भारताने पाकिस्तानला नमवले आहे. हाच इतिहास पुन्हा रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच डेंग्युची लागण झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानविरुद्धचे सामने खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर इशान किसन हा सलीमाला आला होता. पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 47 धावांची खेळी केली आहे. आता या सामन्यासाठी शुभमन गिलही उपलब्ध होणार आहे. गिल हा तंदुरुस्त असून तो या सामन्यासाठी 99 टक्के उपलब्ध राहील, असे रोहित शर्माने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’
या दोन्ही संघातील क्रिकेटचे युद्ध शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्डेडियमवर होणार आहे. शुभमन गिलला डेंग्यू झाल्यानंतर चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तो दिल्लीतील दुसऱ्या सामन्यासाठी आला नव्हता. आता ते थेट अहमदाबाद येथे दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो प्रॅक्टिसही करत आहे. त्याने गुरुवारी व शुक्रवारी एक तास नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
World Cup 2023 : पराभव ऑस्ट्रेलियाचा पण, धक्का टीम इंडियाला; आफ्रिकेने केला मोठा उलटफेर
अंतिम संघात निवडण्यासाठी तो उपलब्ध असल्याचे रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. गिलच्या संघात पुनरागमनामुळे संघ आणखी मजबूत होणार आहे. कारण आशिया चषकात गिलने पाकिस्तानविरुद्ध जोरदार खेळी केली होती. त्याने दमदार अर्धशतक झळकविले होते. त्यामुळे भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती.
तर इशान किशन संघाबाहेर
या सामन्यात गिल खेळल्यास इशान किशनला अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकणार नाही. मागील दोन्ही सामन्यात इशान किशन सलामीला आला होता. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला भोपळाही फोडता आला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध मात्र त्याने 47 धावांची खेळी केली. अंतिम अकरा खेळाडूंबाबत रोहित शर्मा म्हणाला, संघात किमान एक ते दोन बदल होणार आहे. हे संघातील खेळाडूंना सांगितले आहे. परंतु कोणत्याही खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते हे मात्र रोहित शर्माने स्पष्ट केले नाही. गरज पडल्यास भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.